तिरुअनंतपूरम: जंक फूडचा आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. त्यामुळेच अशाप्रकारच्या खाद्य पदार्थांवर केरळ सरकारनं थेट 'फॅट टॅक्स' लागू केला आहे.

 

केरळ हे देशातील पहिलं राज्य आहे ज्याने रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा, बर्गर आणि सॅण्डविच यासारख्या जंक फूडवर 14.5 टक्के कर लावला आहे.

 

दरम्यान, हा टॅक्स रेस्टॉरंट मालकांना चुकवावा लागणार आहे की, खवय्यांना यांचा भार सोसावा लागणार आहे याबाबत सरकारनं अद्याप काहीही स्पष्ट केलं नाही. केरळच्या अर्थ सचिवांनी याबाबत माहिती दिली की, हा निर्णय आम्ही कॉर्पोरेट्सवर सोडला आहे. हा नियम मॅक्डोनल्ड, डॉमिनोज यासारख्या फूड चेन्सला लागू होणार आहे.

 

केरळ सरकारच्या पॉलिसीनुसार नवे नियम निश्चित करण्यात आले आहे. केरळ सरकारनं फॅट टॅक्स लागू करण्याची घोषणा शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली. यातून सरकारला 10 कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे.