Farmers Protest : शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. हरियाणा पोलिसांनी (Hariyana Police) राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA), 1980 च्या तरतुदींनुसार राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये सक्रियपणे सहभागी असलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाला पोलिसांनी सांगितले की, 13 फेब्रुवारीपासून शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड्स तोडण्यासाठी शेतकरी संघटनांकडून सतत प्रयत्न केले जात आहेत.


कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई


हरियाणा पोलिसांनी शेतकरी आंदोलनाशी संबंधित संघटना आणि नेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकरी नेत्यांवर पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे. गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.


30 पोलीस जखमी, दोन पोलिसांचा मृत्यू


अंबाला पोलिसांनी गुरुवारी सांगितले की 13 फेब्रुवारीपासून 'दिल्ली चलो' मोर्चाच्या संदर्भात शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड्स तोडण्यासाठी आंदोलकांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यावेळी आंदोलक अधिकारी आणि पोलिसांवर दगडफेक करून गोंधळ घालत कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या कालावधीत सरकारी व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आंदोलनात सुमारे 30 पोलीस जखमी झाले. एका पोलिसाला ब्रेन हॅमरेज झाला असून दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.


 


शेतकरी आंदोलकांची मालमत्ता, बँक खाती जप्त केली जाणार


हरियाणाच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या शेतकरी नेत्यांवर एनएसए अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय या आंदोलनात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे झालेले नुकसानही मोजले जात आहे. अंबाला पोलिसांनी याबाबत सांगितले की, शेतकरी आंदोलना दरम्यान पोलिस प्रशासनावर दगडफेक करून, तसेत गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या कालावधीत सरकारी व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी सरकारी आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान केले तर त्यांची मालमत्ता आणि बँक खाती जप्त करून नुकसान भरपाई दिली जाईल, असे प्रशासनाने या संदर्भात सामान्य जनतेला आधीच सावध केले होते.


 


हेही वाचा>>>


Farmer Protest : शेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू? संघटनांनी दिल्ली मोर्चा 2 दिवसांसाठी पुढे ढकलला, पोलिसांनी दावा फेटाळला