Farmer Protest : आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब (Punjab) आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. अशातच हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांने असा दावा केला आहे की, बुधवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका 21 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांनी हा दावा एक अफवा असल्याचं सांगत फेटाळून लावलंय.


 


दिल्लीकडे जाणारा मोर्चा पुढे ढकलला


एकीकडे एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत मोदी सरकारने 5 मोठे निर्णय घेतले आहेत. दरम्यान, हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा दावा आहे की, बुधवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका 21 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी हा दावा अफवा असल्याचं सांगत फेटाळून लावलं आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी गुरुवार आणि शुक्रवार असे पुढील दोन दिवस दिल्लीकडे जाणारा मोर्चा पुढे ढकलला आहे. शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत पुढील रणनीतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


 


हरियाणा पोलिसांची सोशल मीडियावर पोस्ट


शेतकरी नेते बलदेव सिरसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगरूर-जिंदला जोडणाऱ्या खनौरी सीमेवर बुधवारी भटिंडा येथील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय शुभकरन सिंहचा मृत्यू झाला. पटियाला येथील राजिंदर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एचएस रेखी यांनी सांगितले की, खनौरी येथून तीन जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या, तर इतर दोन जणांची प्रकृती स्थिर असल्याचे रेखींचे म्हणणे आहे. हरियाणा पोलिसांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांना अद्याप सीमेवर कोणत्याही आंदोलकाच्या मृत्यूची माहिती मिळालेली नाही.


 


 






 


 


पोस्टमध्ये काय म्हटलंय?


हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यास नकार दिला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही केवळ अफवा आहे. असं पोस्टमध्ये म्हटंलय.


 


शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा थांबवला, सायंकाळी आंदोलनाची पुढील रणनीती ठरणार


शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी सांगितले की, दिल्लीचा मोर्चा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. पुढील रणनीतीची माहिती शुक्रवारी संध्याकाळी दिली जाईल. शेतकरी आणि सरकार यांच्यात गेल्या रविवारी झालेल्या चर्चेची चौथी फेरी निष्फळ ठरली. तेव्हापासून शेतकऱ्यांना दिल्लीच्या हद्दीत जायचे आहे. अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांशी चर्चेची पाचवी फेरी घेण्याची तयारी दर्शवली आहे.


 


हेही वाचा>>>


FRP मध्ये वाढ, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय!