Farmers Protest News : नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. आज या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं देशव्यापी निषेध व्यक्त केला जाणार आहे. शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं या निमित्तानं सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत सरकारच्या विरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. या आंदोलना दरम्यान, शेतकऱ्यांच्या वतीनं लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राचे वडिल केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी करणार आहेत. तसेच, शेतकऱ्यांच्या वतीनं अजय मिश्रा यांची अटक आणि या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, या मागणीसाठी देशभरातील जिल्हा मुख्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. या मागण्यांबाबत किसान मोर्चाच्या वतीनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात येणार आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवण्यात येणाऱ्या निवेदनात लिहिलं आहे की, "3 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडांचा (ज्याला 3 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे) जसा तपास होत आहे, त्यामुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेबाबत सुप्रीम कोर्टाने यापूर्वीही अनेक प्रतिकूल टिप्पणी केली आहे."


याव्यतिरिक्त निवेदनात लिहिलं आहे की, "महत्त्वाचं म्हणजे, नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारमधील नैतिकतेच्या अभावामुळे देश हैराण झाला आहे. जिथे अजय मिश्रा टेनी मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर आहेत. दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेत वापरलेले वाहन मंत्र्यांचे आहेत. मंत्री 3 ऑक्टोबर 2021 पूर्वीच्या किमान तीन व्हिडीओंमध्ये रेकॉर्डवर आहेत. जे जातीय वैर आणि द्वेषाला प्रोत्साहन देतात."


निवेदनात हे देखील म्हटलं आहे की, "त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या विरोधात चिथावणीखोर आणि अपमानास्पद भाषणही केले. खरं तर, त्यांनी व्हिडीओमध्ये त्याच्या संशयास्पद (गुन्हेगारी) पूर्ववृत्तांचा उल्लेख करण्यासही संकोच केला नाही. एसआयटीने मुख्य आरोपींना समन्स बजावल्यानंतर मंत्र्यानं सुरुवातीला आरोपींना (त्याचा मुलगा आणि त्याचे सहकारी) आश्रय दिला."


महत्त्वाच्या इतर बातम्या :