स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) खाते असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. सध्या सायबर गुन्हेगारीच्या  (Cyber Crime) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतात सणासुदीच्या काळात सायबर गुन्हेगार नागरिकांना गिफ्ट्सचे देण्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करीत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना सावधानीचा इशारा दिला. मोबाईवर येणारा मॅसेज किंवा कोणतीही लिंक ग्राहकांच्या आयुष्यभराच्या कमाईवर पाणी टाकू शकते. दरम्यान, हॅकर्स फिशिंग अटॅकद्वारे लोकांशी फसवणूक करत आहेत. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून ग्राहकांना सतर्क केले आहे.


हिंसेसंबंधी पोस्ट, अपशब्द आणि अनधिकृत अकाऊंट्सला रोखण्यात फेसबुक अपयशी! रिपोर्टमधून माहिती


एसबीआयने नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी आपल्या ग्राहकांना असे म्हटले आहे की, तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या मॅसेजला बळी पडून कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. जर तुम्ही अशाप्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लिक कराल तर, तुमच्या खात्यातील पैसे गायब होण्याची शक्यता आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी त्याची खात्री करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, सायबर गुन्हेगारीचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. ज्यात नागरिकांना भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते. जर तुम्हालाही अशाप्रकारचा कोणताही मॅसेज आला तर, त्याकडे दुर्लक्ष करा. या मॅसेजमुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे, असेही एसबी आयने म्हटले आहे. 


PhonePe Processing Fee: PhonePe वर मोबाईल रिचार्जसाठी आता प्रोसेसिंग फी द्यावी लागणार


पुढे एसबीआयने म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही ग्राहकांना त्यांची वयैक्तिक माहिती (खाते क्रमांक, सीव्हीव्ही, पिन, ओटीपी) विचारत नाही. जर कोणी तुम्हाला असे तपशील विचारत असेल तर तुम्ही सावध राहा. या व्यतिरिक्त तुमचे वैयक्तिक तपशील कोणाशीही शेअर करू नका.


कोरोना काळात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली. ज्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अशा स्थितीत तुम्हाला कोणत्याही अज्ञात मेसेज किंवा लिंकबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. बहुतेक लोक अशाप्रकारच्या मॅसेजला बळी पडतात. सायबर गुन्हेगार फिशिंगद्वारे बँक तपशील घेतात आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यातून पैसे गायब करतात. सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईल क्रमांकावर आमिष दाखवण्यासाठी विविध प्रकारचे मॅसेज पाठवतात. हे मॅसेज इतके आकर्षक असतात की, कोणताही व्यक्ती त्यांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.