एक्स्प्लोर

Tractor Parade Preparation : प्रचंड थंडीतही शेतकरी आंदोलनावर ठाम, ट्रॅक्टर परेडची तयारी जोरात

Tractor Parade Preparation : 26 जानेवारीला एकीकडे राजपथावर परेडची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी गेले दोन महिने आंदोलन करत आहेत. तेच शेतकरी आता ट्रॅक्टर परेडची तयारी करत आहेत.

Farmers protest update : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा एकीकडे निकाली निघत नसतानाच दर दिवसाआड केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये असणारा संघर्ष आणखी पेटताना दिसत आहे. येत्या 26 जानेवारीला एकीकडे राजपथावर परेडची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी गेले दोन महिने आंदोलन करत आहेत. तेच शेतकरी आता ट्रॅक्टर परेडची तयारी करत आहेत. या परेडसाठी त्यांना ठराविक मार्ग करून देण्यात आलेले आहेत.

अशी असणार ट्रॅक्टर परेड यामध्ये सिंधू बॉर्डर वरून 74 किलोमीटर परेड असणार आहे. तर टिकरी बॉर्डर 83 किलोमीटर, गाजीपूर 68 किलोमीटर, चिला बॉर्डरवरून 10 किलोमीटर या सगळ्या मार्गांवर अशी रॅली होऊन पुन्हा एकदा ज्या ठिकाणी हे सगळे शेतकरी आंदोलन करत आहेत त्याच ठिकाणी येणार आहेत. अनेक ठिकाणी मैदानांवर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर जमायला सुरुवात देखील झाले आहे .मात्र यामुळे 26 जानेवारीला दिल्लीतील सीमा मात्र जॅम होणार आहेत.

दिल्लीच्या सीमेवर सध्या प्रचंड थंडी दिल्लीच्या सीमेवर सध्या प्रचंड थंडी पडतेय. परंतु इतक्या थंडीतही शेतकऱ्यांचा उत्साह जरा देखील कमी झाला नाही. त्यांच्या भूमिकेवर ते अद्यापही ठाम आहेत. जोपर्यंत सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळेच कडाक्याच्या थंडीतही 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीची जोरदार तयारी सुरू आहे. या ट्रॅक्‍टर रॅलीमध्ये काही घोडे देखील असणार आहे. या घोड्याना थंडी वाजू नये यासाठी खास कपडे तयार (Jacket) करण्यात आले आहेत. जागोजागी शेकोटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांसह लहान मुलं, महिला,वृद्ध नागरिक या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या सगळ्यांना या थंडीत चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या थंडीपासून शेतकऱ्यांच्या बैलांचं, लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी काही तरुण मंडळी पुढे आली आहे आणि त्यांनी टेंट सिटी सिंधू बॉर्डरवर तयार केली आहे.ज्यामध्ये दोनशेहून अधिक टेंट लावण्यात आले आहेत आणि लोकांना ब्लँकेट गादी या सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली जात आहे.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget