मुंबई : फनी चक्रीवादळ ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. हे चक्रीवादळ वेगाने ओदिशाच्या दिशेने घोंघावताना दिसत आहे. फनी चक्रीवादळामुळे हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागांना सतर्कतेचा इशारा जाहीर केला आहे.


फनी चक्रीवादळामुळे ओदिशामधील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसंच पर्यटकांनाही पुरी शहर सोडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर एनडीआरएफ आणि नौदलाला सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. तसंच शेतीसह रस्त्यांचंही नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.