आज सकाळी पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हवाई हद्दीत शिरली होती. त्यानंतर भारतीय वायु दल सज्ज झाल्यानंतर या विमानांनी पळ काढला. भारतीय वायुसेनेनं यापैकी एक एफ-१६ विमान पाडल्याचं सध्या वृत्त आहे. पाकिस्तानकडून देखील भारताचं विमान पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र ते पटवून देण्यासाठी त्यांच्याकडून जुन्या छायाचित्रांचा आधार घेण्यात येत आहे. पीटीव्ही न्यूजने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ओदिशामधील अपघातग्रस्त विमानाचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.
भारताच्या तिन्ही सैन्यदल प्रमुखांची तातडीची बैठक | एबीपी माझा