एक्स्प्लोर

ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास रिफंड मिळेपर्यंत ग्राहकाला दर दिवशी शंभर रुपये, आरबीआयचे निर्देश

तुमचा ऑनलाइन व्यवहार काही कारणास्तव अयशस्वी झाल्यास आता ग्राहकांना जर एक दिवसाच्या आत ते पैसै तुम्हाला परत मिळाले नाहीत तर दरदिवशी 100 रुपये मिळणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. UPI, IMPS, NACH द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू आहे.

मुंबई : ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाला तरी आता चिंता करण्याचं कारण नाही. कारण आता अशा व्यवहारात रिफंड मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये बँक ग्राहकाला देणार आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं परिपत्रक जारी केलं आहे. तुमचा ऑनलाइन व्यवहार काही कारणास्तव अयशस्वी झाल्यास आता ग्राहकांना जर एक दिवसाच्या आत ते पैसै तुम्हाला परत मिळाले नाहीत तर दरदिवशी 100 रुपये मिळणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. UPI, IMPS, NACH द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू आहे. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार निश्चित वेळेत फेल रकमेचे पेमेंट होत नसेल तर बँकांना संबंधित ग्राहकास प्रतिदिन 100 रुपयांच्या हिशेबाने दंड द्यावा लागेल. ग्राहकांना या नियमानुसार लाभ न मिळाल्यास रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतात. हा नियम 15 ऑक्टोबर 2019 पासून लागू होणार आहे, असे या परिपत्रकात नमूद केले आहे. आरबीआयने ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास संबंधित टर्न अराउंड टाइम (टीएटी) नियमांत बदल केला आहे. या बदलानंतर बँक ग्राहकांना फेल ट्रान्झॅक्शनच्या पैशांसाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अशा प्रकरणांची स्वत:हून दखल घेत ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा होतील. बँकांना तक्रारीविना ग्राहकांना पैसे परत करावे लागतील. बँकांकडे तक्रार केल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएम आणि अन्य इलेक्ट्रिक देय व्यवहार निष्फळ झाल्यानंतर बँकांसाठी ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा अवधी निश्चित केला आहे. बँक खात्यातून पैसे कापले जात असतील आणि एटीएममधून रोकड मिळत नसेल तर अशा प्रकरणांत बँकेस ट्रान्झॅक्शनच्या पाच दिवसांच्या आत ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील. डिजीटल व्यवहारांव्यतिरिक्त आरबीआयने नॉन-डिजीटल ट्रान्झॅक्शन्ससाठीही वेळेची मर्यादा आखून दिली आहे. एटीएम आणि मायक्रो एटीएममध्ये अयशस्वी झालेल्या व्यवहारांसाठी खात्यात पैसै येण्यास पाच दिवसांपर्यंतची मर्यादा आखण्यात आली आहे. त्यानंतर दररोज 100 रुपये दंड बँकांना द्यावा लागेल. ही दंडाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात त्वरीत पोहोचायला हवी, ग्राहकांनी तक्रार करण्याची वाट बँकांना पाहू नये, असंही आरबीआयने परिपत्रकात नमूद केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
Embed widget