या गर्भवती महिलेला विमानात प्रवासादरम्यानच प्रसूती वेदना सुरु झाल्या होत्या. यानंतर विमानातील क्रू मेंबर आणि इतर महिला प्रवाशांच्या मदतीने तिची प्रसूती करण्यात आली. यादरम्यानच वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनाही याची महिती दिली.
एटीसीच्या निर्देशानंतर इमर्जन्सी लँडिंग
एटीसीने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून विमान तात्काळ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळवर उतरवण्याचे निर्देश दिले. यानंतर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. यानंतर विमान कंपनी तसंच विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी महिला आणि नवजात बाळाला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. बाळ आणि बाळंतिणीला विमानाबाहेर आल्यानंतर विमानाने नियोजित ठिकाणी जाण्यासाठी उड्डाण केलं.