World Environment Day 2022: पाच जून जागतिक पर्यावरण दिनी भारताने आणखी एक यश मिळवलं आहे. आज भारताने पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष गाठले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सेव्ह द सॉईल कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. पेट्रोलमध्ये 10 टक्के मिश्रण केल्याने केवळ कार्बन उत्सर्जन कमी होणार नाही, तर इथेनॉलचा वापर करून शेतकर्‍यांच्या कमाईचे साधनही ठरेल. पंतप्रधानांनी जून 2021  मध्ये प्रकाशित केलेल्या “भारतामधील इथेनॉल मिश्रणाचा मार्ग 2020-25” मध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे ध्येय गाठ्ण्यासाठीचा मार्ग तपशीलवार मांडण्यात आला होता. 


मात्र, सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) केलेल्या समन्वयीत प्रयत्नांमुळे 10% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट नोव्हेंबर, 2022 या नियोजित वेळेच्या खूप आधी पूर्ण झाले आहे. यानुसार सार्वजनिक क्षेत्रातल्या ओएमसी नी देशभर पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.






गेल्या 8 महिन्यांमधील या उद्दिष्ट पूर्तीने केवळ भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवली नाही, तर 41,500  कोटी पेक्षा जास्त परदेशी चलनाच्या स्वरुपात त्याचा लाभ झाला,  हरित वायु उत्सार्जानामध्ये (GHG) 27 मेट्रिक टन घट झाली तर शेतकर्‍यांना 40,600 कोटी रुपये खर्चाची रक्कम प्रदान करण्यात आली. सरकारने केलेल्या या सर्व उपाययोजनांमुळे ईबीपी कार्यक्रम 2025-26 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष गाठण्याच्या मार्गावर आहे.


संबंधित बातमी: 


Nitin Gadkari : साखरेचं उत्पादन कमी करुन इथेनॉल वाढवावं, नितीन गडकरींचा सल्ला
Ethanol :  2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण, केंद्र सरकारचा निर्णय
साखरेचं उत्पन्न कमी करुन इथेनॉलची निर्मिती करणार : शरद पवार