Jammu Fire News : जम्मूतील सतवारी पोलीस स्टेशनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत पोलीस ठाण्याच्या परिसरात उभी असलेली अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत.  ही घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. 


आज (रविवार) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांनाही आग लागली. काही वेळातच आगीनं संपूर्ण पोलीस ठाण्याला वेढले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या  तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर 30 ते 40 मिनिटात आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, प्राथमिक तपासानुसार आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे. तरी देखील अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. पुढील तपास सुरु आहे. 


सतवारी पोलिस ठाण्यामागील रिकाम्या मैदानात 40-50 वाहने उभी होती. तसेच परिसरात लहान लहान झुडपेही भरपूर होती. लागलेल्या आगीनंतर अचानक झुडपांनी पेट घेतला. त्यानंतर जवळच लावलेली वाहनं देखील आगीत जळून खाक झाली आहेत. वाहनांमध्ये पेट्रोल असल्याने आग लागताच मोठे आवाजही आले. मैदानाच्या जवळच पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही बांधण्यात आली आहेत. आग लागताच पोलीस कर्मचारी देखील क्वॉर्टरमधून बाहेर पडले. त्यांनीही आग विझवण्यास सुरुवात केली. आग इतकी झपाट्याने पसरली की तिच्या उंचच उंच ज्वाळा दिसत होत्या. 
 
ही आग रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लागली होती. यामध्ये  कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. आग लागताच पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी बाहेर आले. त्यानंतर हळूहळू आग भडकू लागली. तत्काळ घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली होती. त्यानंत अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग अटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, पोलीस स्टेशनच्या परिसरात लावलेली वाहणं आगीत जळून खाक झाली आहेत. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.