Nitin Gadkari : साखर आणि इथेनॉलला चांगले दिवस आले आहेत. साखरेचं उत्पादन कमी करुन इथेनॉल वाढवलं पाहीजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. इंधन एवढ्या प्रमाणात आलं तर प्रदुषणही वाढेल. दिल्लीत प्रदुषणाची काय परिस्थिती आहे याची आपल्याला माहिती आहे असेही गडकरी म्हणाले. साखर बनवण्याचा मोह ठेवला तर यावर्षी चांगल मार्केट मिळेल पण पुढील वर्षी फार बेकारी होईल असेही गडकरी यांनी सांगितलं.


आजूबाजूला इथेनॉल पंप सुरु करा


टोयाटो, सुझुकी आणि टाटा या तीन महत्वाच्या कंपन्या आहेत. या तीनही कंपन्या फ्लेक्स इंजिन बनवायला तयार आहेत. जैवइंधन पंप स्टेशन खोलण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुण्यात तीन स्टेशनच उद्घाटन पंतप्रधान यांनी केलं आहे. पण भरायला कोणी येत नसल्याचे गडकरी म्हणाले. इथेनॉल उत्पादन करणाऱ्यांना माझी विनंती आहे की, आपल्या आजूबाजूला इथेनॉल पंप सुरु करा असेही गडकरी यांनी सांगितले.


संरक्षण विभागातही इथेनॉल वापरण्याच्या संदर्भात चर्चा सुरु 


आपल्याकडे तांदूळ एवढा आहे की आपण जगाला त्याचा पुरवठा करु शकतो. मी पंतप्रधानांना भेटून सांगितलं होतं की देशातील 186 मतदारसंघात साखर उत्पादनाचा प्रभाव आहे. त्यांना जर आपण चांगला दर दिला नाही तर सरकारालाही ते हालवू शकतात असेही गडकरी यावेळी म्हणाले. दरम्यान, भारत सरकारने बांबुपासुन इथेनॉल बनवलं आहे. मात्र, त्याचा खर्च जास्त आहे. ग्रीन हायड्रोजनची कार ही माझ्या घरी सक्सेस झाली आहे. ग्रीन पॉवरचे ज्यांचे अॅग्रीमेंट संपलं आहे. त्यांच्याकडून सरकार आता पावॅर घेत नाही, कारण सरकाराला ती महाग पडते. पण सरकाने ती घेतली पाहिजे असे गडकरी यावेळी म्हणाले. संरक्षण विभागातही इथेनॉल वापरण्याच्या संदर्भात माझी चर्चा सुरु असल्याचे ते म्हणाले.


हिंदुस्तान लोकसंख्या वाढवण्यात आणि वाहनांची संख्या वाढवण्यात एक नंबर असल्याचे गडकरी म्हणाले. शेतकऱ्यांना आता अन्नदाता नाही तर उर्जादाता बनवायचं आहे. अन्नदाता बनवत राहिलो तर गरीबच राहील असेही गडकरी यावेळी म्हणाले. साखरेचच उत्पादन करत राहीलो तर परिस्थिती वाईट होईल असेही गडकरींनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: