एक्स्प्लोर

कर्मचाऱ्यांना खुशखबर! अर्थ मंत्रालयाकडून पीएफवरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालयाला देशातील सामन्यांच्या मागणीपुढे पुन्हा एकदा झुकावं लागलं आहे. अर्थमंत्रालयाने ईपीएफओअंतर्गत पीएफच्या व्याजदरात वाढ केली आहे. पीएफ व्याजदर 8.70 टक्क्यांवरुन वाढून 8.8 टक्के झाले आहेत.   चार दिवसांपूर्वीच 25 एप्रिल रोजी केंद्रीय अर्थमंत्रालयाने 2015-2016 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा करत, व्याजदर 8.75 टक्क्यांवरुन 8.7 टक्के केले होते.   मात्र, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टींनी पीएफ खातेधारकांच्या जमा पैशांवर 8.8 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने हा प्रस्ताव फेटाळला होता. विशेष म्हणजे यानिमित्ताने सीबीटीच्या शिफारशी पहिल्यांदाच अर्थमंत्रालयाने फेटाळल्या होत्या. शिवाय, यामुळे देशभरातील अनेक कर्मचारी संघटना अर्थमंत्रालयाच्या विरोधात उतरल्या होत्या आणि आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची विनंती सीबीटीने अर्थमंत्रालयाकडे केली होती.   ईपीएफओने पीएफ खातेधारकांना 2013-14 आणि 2014-15 या आर्थिक वर्षांसाठी 8.75 टक्के व्याजदर, तर 2012-13 या आर्थिक वर्षात 8.5 टक्के व्याजदर आणि 2011-12 या आर्थिक वर्षात 8.25 टक्के व्याजदर दिलं होतं.   दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने काही लहान-सहान बचत योजनांवरील व्याजदरही घटवले होते. फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली होती. त्याचवेळी किसान विकास पत्र, कन्या समृद्धी योजना इत्यादी योजनांवरील व्याजही सरकारने घटवले होते. त्यानंतर ईपीएफचे व्याजदर कमी करत सरकारने सामान्यांच्या खिशावर दुप्पट भार टाकला होता. मात्र, अखेर सरकारने पीएफवरील व्याजदरात वाढ केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Diveagar beach Tragedy: मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला
मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला
Monsoon Rain Update: दुष्काळाची झळ! महाराष्ट्रासह 18 राज्यांचा रेड झोनमध्ये समावेश; परतीचा मान्सून महाराष्ट्र्राची तहान भागवणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
दुष्काळाची झळ! महाराष्ट्रासह 18 राज्यांचा रेड झोनमध्ये समावेश; परतीचा मान्सून महाराष्ट्र्राची तहान भागवणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार
अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Diveagar beach Tragedy : समुद्रातून पाच मिनिटात बाहेर काढलं, तरी आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचे प्राण कसे गेले? कारण आलं समोर
समुद्रातून पाच मिनिटात बाहेर काढलं, तरी आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचे प्राण कसे गेले? कारण आलं समोर
Raj Thackeray on Gandhi Jayanti 2026: सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, पण इतकं सगळं असूनही... राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, महात्मा गांधींचं स्मरण
सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, पण इतकं सगळं असूनही... राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, महात्मा गांधींचं स्मरण
Diveagar beach Tragedy Raigad: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....
Raigad Diveagar beach Tragedy: आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली
आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली
Samruddhi Mahamarg Accident: दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...; 7 जणांचा दुर्दैवी अंत, समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?
दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...; 7 जणांचा दुर्दैवी अंत, समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?
Raigad Diveagar beach Tragedy: मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला
मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला
IND A vs AUS A : साई सुदर्शन निघाला फुसका बार, स्वत:ला सिद्ध करायची संधी होती, पण पुन्हा टाकली नांगी; ऑस्ट्रेलियाकडून मायदेशातच इंडियाची कोंडी
साई सुदर्शन निघाला फुसका बार, स्वत:ला सिद्ध करायची संधी होती, पण पुन्हा टाकली नांगी; ऑस्ट्रेलियाकडून मायदेशातच इंडियाची कोंडी
Hindu Religion: गोत्र म्हणजे नेमकं काय? आपलं गोत्र कसं ओळखावं? धार्मिक विधींमध्ये याला इतकं महत्त्व का? धार्मिक मान्यता सांगते...
गोत्र म्हणजे नेमकं काय? आपलं गोत्र कसं ओळखावं? धार्मिक विधींमध्ये याला इतकं महत्त्व का? धार्मिक मान्यता सांगते...
Embed widget