कोलकाता: देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत सुरू असल्याचं पहायला मिळतंय. सुरुवातीच्या कलानुसार, तृणमूलने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना 191 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपनेही अनेक जागांवर मुसंडी मारून आपण सत्तेच्या शर्यतीत असल्याचं दाखवून दिलंय. सध्या तृणमूल 191 जागांवर आघाडीवर असून भाजप 96 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि डावे यांची आघाडी केवळ 6 जागांवर पुढे आहे. 


नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू असून दुसऱ्या मतमोजणी अखेर ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. भाजपचे शुभेन्दु अधिकारी आघाडीवर आहेत. 


सुरुवातीच्या कलानुसार,  पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 191 जागांवर तर भाजप 96 जागांवर आगाडीवर आहे. काँग्रेस 6 जागांवर आहे. 


नंदीग्राममध्ये चुरशीने 88 टक्के मतदान झालं होतं. या मतदार संघात मुस्लिम मते निर्णायक आहेत. गेल्या निवडणूकीत तृणमूलचे उमेदवार असलेल्या शुभेन्दु अधिकारी यांनी डाव्या पक्षाच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. 


मागील 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा वोट शेअर 44.9 टक्के होता तर भाजपचा 10.2 टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला 37.9  टक्के मतं मिळाली होती तर इतरांच्या खात्यात 7 टक्के मतं होती.