Pm Modi Speech Highlights : देशातील पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यात पाच पैकी पंजाब वगळता इतर चार राज्यांत भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.  विजयानंतर पंतप्रधान मोदी नेमकं कोणत्या मुद्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना होती. पंतप्रधानांनी आजच्या संवादात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. जाणून घेऊया पंतप्रधानांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत.  


  
देशातील राजकारणाची पातळी घसरतेय
सध्या देशातील राजकारणाची पातळी घसरत आहे. देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम केलं जातय. 
कोरोना काळातील सरकारच्या चांगल्या कामवरही टीका करण्यात आली. कोरोनादरम्यान करण्यात आलेल्या लसीकरणाचा विरोधकांकडून नकारात्मक प्रचार करण्यात आला.  


2022 चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवणार 
2017 च्या निकालांनी 2019 चं भवितव्य ठरवलं असं विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलं होतं. त्यामुळे 2022 चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवणार आहेत, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. 


गरीबांचा विकास हाच आमचा ध्यास  
गरीबांचा विकास हाच आमचा ध्यास आहे. भाजप सरकार गरीबांसाठी काम करत आहे. यापुढेही प्रत्येक गरीबापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे.  


भाजपच्या विजयात महिलांचं मोठं योगदान 
 भाजपच्या विजयात महिलांचं मोठं योगदान आहे. जिथं महिलांचा जास्त प्रतिसाद मिळाला, तेथे भाजपचा मोठा विजय झाला आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.  


भाजपने प्रशासन यंत्रणा मजबूत केली
भाजपने प्रशासन यंत्रणा मजबूत केली आणि प्रत्येक काम पारदर्शक केलं. भ्रष्टाचार कमी करण्याचं काम भाजपने केलं आहे. परंतु, केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणला जात आहे.  


 आजच्या निकालाने भाजपच्या कामावर शिक्कामोर्तब 
आजच्या निकालाने भाजपच्या कामावर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपने गरीबांसाठी काम केलं असून त्यामुळे जनतेने आम्हाला विजयी केले. आम्ही देशातील प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचणार आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी दिला.  


जनतेच्या आर्शीवादामुळे भाजपला मोठे यश 
आज कार्यकर्त्यांनी विजयाचा चौकार लगावला आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहन घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानतो.  जनतेच्या आर्शीवादामुळे भाजपला मोठे यश मिळाले आहे.   


गोव्याबद्दलचे सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरले
गोव्यात भाजपचे सरकार येणार नाही, असे एक्झिट पोल होते. परंतु, गोव्याबद्दलचे सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरले आहेत. 


देशाच्या विकासासाठी नव्यानं विचार करा
देशाचा विकास करण्यासाठी आता नव्याने विचार करा, असा टोला पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लागवाला आहे. 


उत्तर प्रदेशच्या जनतेला जायतीयवादात गुंतवून ठेवलं
उत्तर प्रदेशच्या जनतेला जायतीयवादात गुंतवून ठेवलं. तसेच उत्तर प्रदेशला बदनाम करण्याचं काम अनेकांनी केलं. परंतु, जनतेनं त्यांना उत्तर दिलं आहे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे.


महत्वाच्या बातम्या