नवी दिल्ली :  2017 च्या निकालांनी 2019 चं भवितव्य ठरवलं असं विश्लेषकांचे मत होतं. आता 2022 चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले.   पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललंय. यानिमित्ताने दिल्लीच्या पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.


आज उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस 


पंतप्रधान मोदी म्हणाले,  आज उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. भारताच्या लोकशाहीचा हा विजय आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती. होळी 10 मार्च पासून सुरू होईल हे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले. या साठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.  पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललंय.


गोव्यात सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरले


उत्तरप्रदेशात  पहिल्यांदाच एका पक्षाला एवढे मोठे यश मिळाले आहे, गोव्यात सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरले. दहा वर्ष सत्तेत असताना देखील राज्यातील भाजपची संख्या वाढली आहे. राज्यात पहिल्यांदाच एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आली आहे. 


गरीबांना त्यांचा हक्क मिळावा हा भाजपचा ध्यास


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जनतेचा विश्वास संपादन करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती. होळी 10 मार्च पासून सुरू होईल हे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले. या साठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. गरीबांना त्यांचा हक्क मिळावा हा भाजपचा ध्यास आहे. आजच्या निकालाने जनेतने भारताच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. गरीबांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी भाजप प्रयत्न  करते. जोपर्यंत गरीबांना त्यांचा हक्क मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.  प्रत्येक गरीबापर्यंत सरकारी योजना  पोहचवण्यासाठी काम करणार आहे. भाजप प्रत्येक गरीबापर्यंत पोहचणार आहे. 


केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न


भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर ज्यांच्यावर कारवाई केली जात आहे.  त्यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.