Punjab Election Result 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात पहिल्यांदाच आम आदमी पक्ष सरकार स्थापन करणार आहे. या विजयानंतर एकीकडे आप चर्चेत असतानाच इंग्लडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) देखील चर्चेत आला आहे. आर्चरने फेब्रुवारी 2022 मध्ये एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी फक्त Sweep (झाडू) हा शब्द लिहिला होता. आता विजयानंतर आपने हे ट्वीट शेअर करत यावर गमतीशीर उत्तर दिले आहे.     


 






आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये यावेळी निवडणूक लढवली आणि जिंकली. या निवडणुकीत आप 117 पैकी 92 जागांवर आघाडीवर आहे. या विजयानंतर आपने आर्चरचे एक ट्वीट रीट्वीट करताना Yes (हो) असं लिहिलं आहे. या ट्विटनंतर आर्चरने आम आदमी पक्षाच्या विजयाचा अंदाज आधीच लावला होता की काय, अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. याआधी देखील आर्चरचे अनेक ट्वीट व्हायरल झाले आहेत. नुकतेच त्यांचे रशियाबद्दलचे एक ट्वीट व्हायरल झाले होते. ज्यात त्याने रशियाला हिणवत Come on russia असे ट्वीट केले होते. 






दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता आम आदमी पक्षाला जवळपास 92 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. याबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, ''पंजाबच्या जनतेने क्रांती करून दाखवली आहे. पंजाबच्या जनतेने अनेक बड्या नेत्यांना हरवलं आहे.''


संबंधित बातम्या: