Up Election Result 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीतील 403 जागांवरील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने 264 जागांवर आघाडी मिळून राज्यात पुन्हा सत्ता स्थापनेचा मार्ग निश्चित केला आहे. योगी आदित्यनाथ हे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकता. अशातच यूपीत आपली पूर्ण ताकद लावूनही काँग्रेसने पुन्हा एकदा खराब कामगिरी केली आहे. तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला या निवडणुकीत दोन अंकी आकडा ही गाठता आला नाही. अशीच कामगिरी सुरू राहिल्यास 2024 च्या निवणुकीत या दोन्ही पक्षांना आपले खाते तरी उघडता येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


2017 च्या तुलनेत काँग्रेसची यूपीत पीछेहाट 


2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेठी या लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची धुरा ही प्रियंका गांधी यांनी सांभाळली. 'लड़की हूँ लड़ सकती हूँ' हा नारा देत प्रियंका गांधी यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी यूपी निवडणुकीत 40 टक्के महिलांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिले होते. मात्र त्यांना अपयशाचं तोंड पाहावे लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस फक्त 2 जागेवर आघाडीवर आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 7 जा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी काँग्रेसला फक्त 2 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजेच यावेळी काँग्रेसचे आणखी 5 जागांचे नुकसान झाले आहे. 2017 च्या तुलनेत या निवडणुकीत यूपीमध्ये काँग्रेसची मते 3 टक्क्यांवर घसरली.    


यूपीत बसपाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला?


उत्तर प्रदेश निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 2007 मध्ये एक हाती सत्ता मिळवणारा बसपा पक्ष आता यूपीत फक्त 1 जागेवर सीमित झाला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 19 जागांवर यश मिळालं होतं. मात्र 2022 ची निवडणूक येता-येता पक्षात फक्त 3 आमदारच शिल्लक राहिले. यामधील काही आमदारांनी बसपाची साथ सोडत भाजप आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. तर काहींना स्वतः बसपा पक्ष प्रमुख मायावती यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बसला आपला 2017 चा आकडाही पुन्हा गाठता आला नाही आहे.    


संबंधित बातम्या :