मुंबई: गतवर्षीप्रमाणं यंदाही पाऊसमान चांगलंच राहिल आणि अल निनोच्या त्यावर फार परिणाम होणार नाही. असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
अल निनोसंदर्भात एप्रिल-मेनंतरच ठोस अंदाज बांधता येईल असं हवामान विभागानं सांगितलं आहे. मागील आठवड्यात खासगी हवामान संस्था स्कायमेटनं यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहिल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, इतक्या लवकर अल निनोचा अंदाज बांधणं चुकीचं असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
अल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडेपर्यंत भारतीय उपखंडातून मान्सून परतलेला असेल असं आयएमडीनं सांगितलं आहे. त्यामुळं आता हवामान विभागाचा अंदाज खरा ठरावा, आणि मान्सूनराजा यंदाही चांगलाच बरसावा हीच अपेक्षा.
फेब्रुवारी ते मे या काळातील अल निनोचा अंदाज तंतोतत खरा उतरतोच असं नाही. अल निनोमुळे जगाच्या बहुतांश भागात/ भारतात कमी पाऊस/दुष्काळ/अवर्षणाची स्थिती होते. तर अल निनोमुळे भारतात सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्यास मदत होते. ऑस्ट्रेलियासारख्या काही देशात महापुराच्या घटनाही घडतात.
अल निनोचा प्रभाव कमी होऊन तो न्यूट्रल राहिला, तरी आपल्याकडे सरासरी पाऊसमान होण्याच्या आशा वाढतात.
2016 हे वर्ष आत्तापर्यंतच्या सर्वात उष्ण वर्षांपैकी एक मानलं जातं. त्याचा सर्वाधिक फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. मात्र भारतात आणि त्यातही महाराष्ट्रासाठी 2016 हे आधीच्या तुलनेत चांगल्या/सरासरी पावसाचं वर्ष राहिलं.
संबंधित बातम्या:
यंदाच्या पावसावर अल निनोचं सावट