या संपूर्ण परिसराला सध्या सुरक्षा जवानांनी वेढा दिला असून सध्या दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरु आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील पुलवामातील त्राल परिसरात तीन ते चार दहशतवादी लपले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु असताना तेथील स्थानिकांनी लष्कारवर दगडफेकही केली होती.
तर काही दिवसांपूर्वी हंदवाडामधल्या चकमकीवेळी सैन्य दलाचे चार जवान शहीद झाले होते. यावेळी दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी काही स्थानिकांनी सैन्य दलावर दगडफेक केली होती. अन् त्याचा आडपडदा घेऊनच दहशतवाद्यांनी सैन्य दलाला लक्ष्य केलं होतं.
दुसरीकडे काल उत्तरप्रदेशमधील ठाकूरगंजमध्ये एका संशयित दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. ठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव सैफुल्लाह असून तो आयसिसशी संबंधित असल्याची माहिती एसटीएसनं दिली आहे.
संबंधित बातम्या: