एक्स्प्लोर

'खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल'

नवी दिल्ली: महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित दाऊद कॉलप्रकरणी केंद्रीय नेतृत्त्वाने गंभीर दखल घेतल्याचं भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं. तसंच राज्य सरकारनं याप्रकरणी चौकशी सुरु केली असून, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही शाह यांनी नमूद केलं.   महसूल मंत्री एकनाथ खडसेंवर सध्या आरोपांची मालिका सुरु आहे. खडसेंसाठी आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.   आज भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेतली. एकीकडे दोन वर्षात भाजपवर एक रुपयाच्याही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही असं अमित शहा सांगत होते. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या मंत्र्यावर हे आरोप होतायत, त्याचं काय अशा प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागत होतं.   पत्रकार परिषदेत बोलताना शहांनी या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं योग्य ती चौकशी सुरु झाल्याचं सांगितलंच. मात्र नंतर अनौपचारिक गप्पांमध्ये या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं अमित शहांनी नमूद केलं.   खडसेंबद्दलचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांना घ्यायचाय, मी त्यांच्या कामात ढवळाढवळ करणार नाही असं शहांनी म्हटलं आहे. प्रकरण गंभीर असल्याचं मी मानतो, एकदा मीडियातली चर्चा थांबली की आम्ही त्याबद्दलची चर्चा करु असं शहांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.   त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असतानाच आता 11 खाती असलेल्या खडसेंचं भाजप काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.   गेल्या 15 दिवसांपासून खडसेंवरच्या तीन आरोपांची चर्चा केवळ  महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातल्या मीडियात सुरु आहे. द्वितीयवर्षपूर्तीच्या जल्लोषाला या आरोपांमुळे काहीसा अपशकून झाल्याचीही कुजबूज दिल्लीतल्या वर्तुळात सुरु आहे.     दाऊद -खडसे कथित कॉल प्रकरण   मंगेश भंगाळे या इथिकल हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला. दाऊदच्या कॉललिस्टमध्ये 10 भारतीय नंबर होते, त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.   मंगेश भंगाळेनेच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या ४ क्रमांकात एक नंबर खडसेंचा आहे, असंही त्यानं म्हटलं होतं.   याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन खडसेंना क्लीन चीट दिली आहे.   संबंधित बातम्या

खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दाऊदला कॉल प्रकरणी खडसेंना पोलिसांचा दिलासा

खडसेंचा राजीनामा घेऊन चौकशी करा: प्रीती मेनन

‘दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार’, प्रीती मेनन यांची माहिती

पैसे घेऊन आरोप करणाऱ्या दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : खडसे

‘खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा’

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget