मुंबई : इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद  यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घरं आणि धार्मिक ठिकाणं आकर्षक रोषणाईनं सजवल्या जातात, प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचं, कुराणाचं पठण केलं जातं. 


इस्लाममध्ये दान करण्याला मोठं महत्व आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने आजच्या दिवशी गरीबांमध्ये अन्नदान केलं जातं. ईद-ए-मिलाद-उन-नबीचा आजचा दिवस हा मालविद (Mawlid) या नावानेही ओळखला जातो. 


इस्लामिक कॅलेन्डरनुसार, ईद-ए-मिलाद-उन-नबी सण तिसऱ्या महिन्यात साजरा केला जातो. हा सण भारत, पाकिस्तान, बांग्लादेश तसेच जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सुन्नी आणि शिया हे दोन पंथ वेगवेगळ्या दिवशी ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण साजरा करतात. 


ईद-ए-मिलाद-उन-नबी चा इतिहास
इस्लाम कॅलेन्डरच्या तिसऱ्या महिन्यातील 12 तारखेला, इसवी सन पूर्व 517 मध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता. सर्वात आधी हा सण इस्त्रायलमध्ये साजरा करण्यात येत होता. त्यानंतर अकराव्या शतकापासून जगभरात हा सण साजरा करण्यात येऊ लागला. 


ईद-ए-मिलाद-उन-नबी चे महत्व
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने सर्वत्र मिरवणूका काढण्यात येतात. मस्जिदीमध्ये नमाज पडण्यात येतात, त्याचवेळी पैगंबरांचा संदेशाचा सर्वत्र प्रसार करण्यात येतो. आजच्या दिवशी गरीबांमध्ये अन्नाचे दान केलं जातं. 


महत्वाच्या बातम्या :