Eggs Freezing in India : महिलांसाठी एग्ज फ्रीजिंग म्हणजेच स्त्रीबीज गोठवणे ही उशीरा गर्भधारणेची एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. यामध्ये महिलांचे स्त्रीबीज विशेष तंत्रज्ञानाने गोठवली जातात आणि नंतर जेव्हा त्यांना आई व्हायचे असेल तेव्हा ती अंडी आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरून वापरली जातात. यानुसार महिलांची प्रजनन क्षमता एका वयापर्यंत टिकते.


भारतात अविवाहित स्त्री एग्ज फ्रिजींग शकते का?


महिलांची प्रजनन क्षमता 20 ते 30 वर्षे वयापर्यंत सर्वोत्तम मानली जाते. वयानुसार, प्रजनन क्षमता हळूहळू कमी होते. म्हणूनच ज्या स्त्रिया उशीरा गर्भवती होण्याची योजना आखत आहेत, त्यांनी हे तंत्र वापरावे. तसेच, या प्रक्रियेपूर्वी, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, आपल्या देशाचा कायदा हा प्रजनन अधिकार देतो की नाही? अलीकडे, हा मुद्दा चांगलाच तापला कारण चीनमध्ये टेरेसा जू ही 34 वर्षीय महिला एग्ज फ्रिजींगबाबत कोर्टात केस हरली. टेरेसा यांनी आरोप केला होता की, तिची अविवाहित स्थिती जाणून घेऊन हॉस्पिटलने तिच्या एग्ज फ्रीजिंगला नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.


भारतातील कायदा काय म्हणतो?


भारतात मात्र एग्ज फ्रीजिंग म्हणजेच महिलांचे स्त्रीबीज गोठवणे हे देशातील कोणत्याही कायद्याच्या कक्षेत येत नाही, म्हणजेच सध्या त्यासाठी कोणताही कायदा नाही. यापूर्वी अनेक नामवंत सेलिब्रिटींनी एग्ज फ्रिजींग करून घेतली आहे. टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित एकता कपूरने वयाच्या 36 व्या वर्षी एग्ज फ्रिजींग केले आहे. त्याच वेळी, अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी हिला वयाच्या 39 व्या वर्षी एग्ज फ्रिजींग केले. आणखी एक अभिनेत्री मोना सिंगनेही हे तंत्र वापरले आहे. याचा अर्थ असा की अविवाहित महिला उशीरा आई होण्यासाठी त्यांची अंडी गोठवू शकतात.


अशा प्रकारे होते एग्ज फ्रिजींग


अंडी गोठवण्यासाठी, प्रथम स्त्रियांच्या अंडाशयातून स्त्रीबीज काढली जातात आणि नंतर प्रयोगशाळेत शून्य तापमानात गोठविली जातात. यामुळे स्त्रीबीजांची जैविक हालचाल काही काळ थांबते, ती नंतर उपयोगी पडतात. जेव्हा स्त्रीला आई व्हायचे असते, तेव्हा गोठवलेली अंडी म्हणजेच स्त्रीबीज योग्य तापमानात फलित करून शुक्राणूंमध्ये मिसळून IVF तंत्रज्ञानाद्वारे तिच्या गर्भाशयात हस्तांतरित टाकली जातात. वैद्यकीय भाषेत स्त्रीबीज गोठवण्याला क्रायोप्रिझर्वेशन म्हणतात.


एग्ज फ्रिजींगसाठी सर्वोत्तम वय काय आहे?


संशोधन असे सूचित करते की, एग्ज फ्रिजींगसाठी वय खूप महत्वाचे आहे. तरुण स्त्रिया किंवा मुलींना कमी अंडी द्यावी लागतात तर वृद्ध महिलांना हे विशेष तंत्र वापरण्यासाठी जास्त अंडी द्यावी लागतात. अहवालानुसार, वयाच्या 34 व्या वर्षी, महिलांची किमान 10 स्त्रीबीज गोठविली जातात, वयाच्या 37 व्या वर्षी ही संख्या दुप्पट होऊन 20 स्त्रीबीज होते. वयाच्या 42 व्या वर्षी स्त्रीला 61 स्त्रीबीज गोठवावी लागतात. म्हणून, ज्या महिलांना वयाच्या 30 नंतर आई व्हायचे आहे आणि हे तंत्र वापरायचे आहे, त्यांनी 20-27 व्या वर्षी स्त्रीबीज गोठवून घ्यावीत. दरम्यान, तज्ञांनी शिफारस केली आहे की एग्ज फ्रिजींगचे सर्वोत्तम वय 20 वर्षांचे आहे. या वयात स्त्रीबीजांचा दर्जा चांगला असतो आणि त्यांच्या नुकसानीचा धोका कमी असतो.