Petrol Diesel Price:  सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आजही कायम आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 66 दिवस स्थिर आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर आज 105 डॉलर प्रति बॅरलवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर आज 105 डॉलर प्रति बॅरलवर आहे, पण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत का? जाणून घ्या तुमच्या शहरातील शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय आहेत?


कच्च्या तेलाच्या किंमती
जर आपण जागतिक तेलाच्या किंमतीवर नजर टाकली तर WTI क्रूड प्रति बॅरल $ 95.80 वर आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 105 डॉलर प्रति बॅरल दराने दिसत आहे.


दिल्ली, मुंबईसह चार प्रमुख महानगरांमध्ये इंधनाचे दर


दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).