Monkeypox Cases in India : दिल्लीत मंकीपॉक्सचा (Monkeypox) आणखी एक रुग्ण आढळला आहे. या रुग्णाला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात (LNJP Hospital)दाखल करण्यात आले आहे. रुग्णाच्या विदेश प्रवासाची नोंद सापडल्याचे बोलले जात आहे. याच रुग्णालयात मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण उपचार घेत आहे. या नवीन रुग्णासह, भारतातील मंकीपॉक्सच्या पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. केरळमध्ये तीन जणांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याचवेळी तेलंगणामध्ये एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्याचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.


संशयित रुग्ण नुकताच कुवेतला गेला होता
मंकीपॉक्सची लागण झाल्यामुळे 34 वर्षीय व्यक्ती, ज्याला यापूर्वी दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याने विदेश प्रवास केला नव्हता, परंतु देशांतर्गत प्रवास केला होता. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी तेलंगणात आढळून आलेला संशयित रुग्ण नुकताच कुवेतला गेला होता. 20 जुलै रोजी त्यांना ताप आला आणि अंगावर पुरळ उठले. यानंतर त्यांना कामारेड्डी जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पुण्यातील नमुन्याचा निकाल येणे बाकी आहे.


देशातील मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या पाच 


भारतात आतापर्यंत पाच रुग्णांना मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीत नव्याने आढळेल्या रुग्णाआधी भारतात चार रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी आढळलेले मंकीपॉक्सचे तीनही रुग्ण केरळमधील आहेत. या बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. 


मंकीपॉक्स 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' घोषित


जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर भारतातील मंकीपॉक्सचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. जगातील वाढता मंकीपॉक्सचा संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (Director-General of WHO) टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या