National Herald Case: ईडीचे पथक पुन्हा नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात पोहोचले आहे. ईडीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दोन ईमेल पाठवून यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले होते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही झडती घेण्यात येणार होती. सध्या हेराल्ड हाऊसच्या कार्यालयात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. अपॉइंटमेंट स्लिप पाहूनच लोकांना पासपोर्ट कार्यालयात प्रवेश दिला जात आहे.


तत्पूर्वी ईडीने मल्लिकार्जुन खरगे यांना गुरुवारी दुपारी 12.30 वाजता यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या हेराल्ड हाऊसमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले होते. खरगे हे यंग इंडियनचे प्रमुख कार्यवाह असल्याने त्यांना बोलावण्यात आले. याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राज्यसभेत सांगितले की, मला ईडीचे समन्स मिळाले. त्यांनी मला दुपारी 12.30 वाजता बोलावले आहे. मला कायद्याचे पालन करायचे आहे. पण संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्यांना बोलावणे योग्य आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानांचा पोलिसांनी घेराव करणे योग्य आहे का? आम्ही घाबरणार नाही, आम्ही लढणार, असं ते म्हणाले आहेत.


यंग इंडिया कार्यालय सील  


मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील काँग्रेसच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला होता. त्यानंतर यंग इंडियाचे कार्यालय सील करण्यात आले. यंग इंडिया ही नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालक आहे. ईडीने मनी लाँड्रिंगच्या तपासासंदर्भात 12 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते.a


काँग्रेस नेत्यांची चौकशी 


या प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांची चौकशी केली आहे. गेल्या महिन्यात सोनिया गांधी यांची तीन फेऱ्यांमध्ये 11 तासांहून अधिक चौकशी करण्यात आली होती. तसेच राहुल गांधी यांची जूनमध्ये पाच दिवसांत 50 तासांहून अधिक चौकशी करण्यात आली. यावरून देशभरातील काँग्रेस सदस्यांनी निषेध व्यक्त केला होता. काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.


इतर महत्वाच्या बातम्या: