एक्स्प्लोर

नीरव मोदीच्या 9 आलिशान कार जप्त, ईडीची कारवाई

एक रोल्स रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज, एक पोर्शे, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हाचा समावेश आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर फरार असलेला नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्या संपत्तीवर कारवाई सुरुच आहे. ईडीने नीरव मोदीच्या 9 आलिशान कार जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये एक रोल्स रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज, एक पोर्शे, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हाचा समावेश आहे. जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यासोबतच ईडीने नीरव मोदीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. ज्याची किंमत सध्या 7 कोटी 80 लाख रुपये सांगितली जात आहे. याचप्रमाणे या घोटाळ्यातील दुसरा आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या संपत्तीवरही ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत. मामा भाच्याच्या या जोडीने पीएनबीत साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. बँकेने प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे एक रुपयाही कर्ज परत करणार नाही, असं उत्तर नीरव मोदीने बँकेला पत्र लिहून दिलं होतं. आतापर्यंत कुणाकुणाला अटक? या प्रकरणी अद्याप 12 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारीही सीबीआयने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांना अटक केली. यामध्ये नीरव मोदीच्या कंपनीचा सीएफओ विपुल अंबानीची अटक सर्वात मोठी कारवाई आहे. वकिलाकडून नीरव मोदीचा बचाव पंजाब नॅशनल बँकेच्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर डायमंड किंग नीरव मोदी भारतातून पसार झाला आहे. मात्र नीरव मोदी पळाला नसून कामानिमित्त अगोदरपासूनच देशाबाहेर असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला. नीरव मोदीची केस लढण्यासाठी दुबईहून भारतात आलेले वकील विजय अग्रवाल यांनी या घोटाळ्यातील प्रश्नांची उत्तरं दिली.

PNB घोटाळा : विपुल अंबानीसह 5 जणांना सीबीआयची अटक

नीरव मोदी कोणत्या देशात आहे, या प्रश्नाचं उत्तर वकिलांनी दिलं नाही. मात्र हा घोटाळ्या जेवढा सांगितला जात आहे, तेवढा नाही, असाही दावा वकिलाने केला. नीरव मोदी निर्दोष असल्याचाही दावा वकिलाने केला. नीरव मोदी प्रकरणात पुढे काहीही होणार नाही : वकील नीरव मोदी तपास यंत्रणांसमोर हजर होणार नाहीत, असंही वकिलाने स्पष्ट केलं. तपास यंत्रणा सध्या नीरव मोदींच्या कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत, असा आरोप वकिलाने केला. याअगोदरही अनेक घोटाळे समोर आले आहेत, मात्र कोर्टात आरोप सिद्ध झालेले नाहीत. नीरव मोदी प्रकरणातही हेच होणार आहे, असा दावा वकिलाने केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Ship Shivalik : होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा
होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Rasgulla Choking Death : रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वास गुदमरून एकाचा दुर्दैवी मृत्यू; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला
रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वासही घेता येईना; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला, झारखंडच्या जमशेदपुरमधली धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget