नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह आसपासचा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. उत्तरेकडील दिल्ली, चंदिगढ, हरियाणा, श्रीनगर या राज्यांमध्ये रविवारी दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले.

 
अफगाणिस्तान, पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. भूकंपाचे केंद्रस्थान अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये आहे.

 
दिल्लीसह नोएडा आणि परिसरात पाच मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवल्याची माहिती आहे. भूकंपामुळे दिल्लीतील मेट्रोसेवाही काही मिनिटांसाठी थांबवल्याचं सांगितलं जातं.