हैदराबाद : हैदराबादमध्ये एक विचित्र अपघात झाल्याचं समोर आलं आहे. हैदराबादमध्ये एअर इंडियाचं विमान वाहून नेणाऱ्या एका क्रेनला अपघात झाला. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
संबंधित विमान हे क्रेनने एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेलं जात होतं. मात्र, क्रेनला भार सहन न झाल्यामुळे आणि वैमानिकाच्या सुटलेल्या नियंत्रणामुळे विमान जमिनीवर आलं.
हैदराबादच्या बेगम विमानतळावर ही घटना घडली. सुदैवानं यात वैमानिकाला कोणतीही इजा झालेली नाही.