Earthquake : भारत आणि बांगलादेश सीमेवर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या आसपास भूकंपाचे धक्का बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. युरोपीयन-भूमध्य भूकंप केंद्राने (ईएमएससी) याबाबतचं वृत्त दिलं आहे. हे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराच्या बाहेर पडली होती. हादरा जाणवल्यामुळे परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. अनेक लोक रस्त्यावर येऊन थांबले होते. काही लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतल्याचेही समोर आलेय. 




युरोपीयन मेडिटेरेनीयन सेस्मोलॅाजिकल सेंटरच्या माहिती नुसार भारत म्यानमार सीमेवरील बांग्लादेशच्या हद्दीतील चितगांव पासून पुर्वेकडे 175 किमीवर भूकंपाचं केंद्र असावं तर भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल होती. तर नॅशनल सेंटल फॅार सेस्मोलॅाजीच्या मते मिझोरममध्ये थेंन्झवालपासून आग्नेयेकडे 73 किमीवर भूकंपाचं केंद्र असावं त्यांच्यामते राष्ट्र स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.1 होती.





भारतात त्रिपुरा, मिझोरम आणि कोलकात्यालाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपची तीव्रता 6 रिश्टर स्केलपेक्षा जास्त आहे. यामध्ये अद्याप किती नुकसान झालेय? याबाबात कोणताही माहिती समोर आलेली नाही.


दरम्यान, महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये गुरुवारी रात्री पुन्हा एकदा भुकंपाचे धक्के जाणवले. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. भुकंपामुळे कोणतीही प्रकारचं नुकसान झालं नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. रत्नागिरीमध्ये महिन्याभराच्या आत भुकंपाचा हा तिसरा धक्का जाणवला आहे.