Gujarat Drugs Case : गुजरातमध्ये (Gujrat)  सहा महिन्यात पाच हजार कोटींचे ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आले आहे.  भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर गुजरात एटीएसने कारवाई केली आहे. गुजरात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात  NDPS अॅक्ट अंतर्गत  422  गुन्हे दाखल केले  आणि  जवळ जवळ   667  ड्रग्ज माफियांना अटक करण्यात आली आहे. 


भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवर गुजरात एटीएसनं कोस्ट गार्डच्या मदतीनं ड्रग्ज माफियांविरोधात इतिहासातील सगळ्यात मोठी संयुक्त मोहीम पूर्ण केली. गुजरात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात NDPS ACT अंतर्गत 422 गुन्हे दाखल केले आणि जवळ जवळ 667 ड्रग्स माफियांना तुरुंगात टाकलं. त्यांच्याकडून 25 हजार 699 किलो ड्रग्ज जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत जवळ जवळ पाच हजार कोटी रुपये आहे.


गुजरात पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात दहा मोठ्या कारवाया केल्या आहेत.  या दरम्यान कराचीतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. ड्रग्जच्या माध्यमातून आपल्या देशातील युवा पिढी खराब करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.  ड्रग्ज माफिया अगोदर पंजाब नंतर दक्षिण भारतातून पाठवत होते. त्यानंतर आता गुजरात सीमेवरून ड्रग्ज पाठण्याचा प्रयत्न करत होते.


अतिशय चलाखीने हे माफिया भारतात ड्रग्ज आणत असल्याची माहिती समोर आली आहे. कपड्याच्या व्यवसायाच्या नावाखाली हे माफिया शर्टच्या कॉलर, बाह्यांची शिलाई यामध्ये ड्रग्ज भारतात आणत. गुजरात पोलिसांनी फक्त ड्रग्जच पकडलं.  नाही तर ड्रग्जच पुरवणाऱ्यांचं जाळंच उद्ध्वस्त केलंय  याचं कारण आहे की व्हारल होणारे ड्रग्ज माफियाचे कॉल रेकॉर्डिंग. या रेकॉर्डिंगमध्ये माफिया दुसऱ्या माफियाला म्हणत आहे की, गुजरात सीमेवरून भारतात ड्रग्ज पोहचवणे कठीण आहे.  गुजरात एटीएधडक कारवाई करीत ड्रग्ज माफियांचं कंबरडं मोडलंय त्यामुळे ड्रग्ज माफिया ड्रग्ज सप्लायसाठी आता दुसरा मार्ग शोधू लागलेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Mumbai Drugs Case : एनसीबीची धडक कारवाई, हायड्रोपोनिक विड, कोकेन आणि 2 लाखांची रोकड जप्त, तिघे अटकेत


International Drugs Syndicate: दिल्लीच्या शाहीन बागेत NCB ची मोठी कारवाई, 50 किलो हेरॉईन आणि 30 लाखांची रोकड जप्त