Drugs Syndicate: शाहीन बागच्या जामिया नगरमध्ये मोठी कारवाई करत एनसीबीच्या दिल्ली युनिटने 50 किलो हेरॉईन आणि 47 किलो संशयित अमली पदार्थ जप्त केले आहेत. यादरम्यान एका घरातून 30 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीनही सापडली आहे. दिल्ली उत्तर विभागाचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, या सर्व वस्तू पिशव्यांमध्ये बांधून ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी निवासी परिसरातून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. आम्ही या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईवरून यामागे एका आंतरराष्ट्रीय संघटनेचा हात असून लवकरच त्याचा पर्दाफाश करू, असे ते म्हणाले.


एनसीबीच्या म्हणण्यानुसार, हे हेरॉईन अफगाणिस्तानातून आले होते. तसेच ही जप्त करण्यात आलेली रोकड हवालाद्वारे आणण्यात आली होती. सागरी मार्गाने आणि सीमेवरून अमली पदार्थ आणले जात होते. हेरॉईन पॅक करून फ्लिपकार्टच्या पॅकिंगमध्ये आणले जात होते. 






सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेरॉईन झाडाच्या फांदीत पोकळी बनवून समुद्रात आणि नंतर पाकिस्तान सीमेवरून लपवून भारतात आणले जात होते. आता एनसीबी विविध शहरांमध्ये छापे टाकून या आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. यामागे इंडो-अफगाण सिंडिकेटचा हात असल्याचे एनसीबीने चौकशीनंतर उघड केले आहे. पंजाब, यूपी, दिल्ली आणि हरियाणामध्ये अमली पदार्थांचा पुरवठा केला जात होता. या खुलाशानंतर एनसीबीने तेथेही छापे टाकले आहेत. या प्रकरणी एनसीबी अधिक तपास करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Petrol Diesel : पेट्रोलच्या किमतीत घट होण्याची चर्चा हवेतच; यावर कोणतीच चर्चा झाली नसल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती