मुंबई:  उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने बाहेर पडणंही कठीण झालं आहे. रायगडमधील भीरा तर देशातील अव्वल आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उष्ण गाव ठरलं आहे.  भीरा गावात मंगळवारी तब्बल 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.


इतक्या भयानक तापमानात उष्माघाताने अनेकांचा मृत्यू होत आहे. जिथे माणसाचं जगणं अवघड झालं आहे तिथे मुक्या प्राण्यांचं काय?

प्रचंड उन्हाने संपूर्ण देश तापला असताना कर्नाटकही त्याला अपवाद नाही. कर्नाटकातही उन्हाने लाहीलाही होत असातना, एक सकारात्मक चित्र पाहायला मिळालं.

कैगा इथं तहानेने व्याकूळ झालेल्या किंग कोब्रा या भयानक सापाला, चक्क बॉटलीतून पाणी पाजण्यात आलं. सहा दिवसांपूर्वी म्हणजेच 24 मार्चला ही घटना घडली.

या घटनेचा व्हिडीओ नुकताच ANI ने  प्रसिद्ध केला आहे.

https://twitter.com/ANI_news/status/847314651851476992