Unmanned Fighter Aircraft : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (DRDO) मानव विरहीत विमान विकसीत करण्यात यश मिळालं आहे. डीआरडीओने या ऑटोनोमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर'चे पहिले उड्डाण यशस्वी केले आहे. भविष्यात हे उड्डाण मानवरहित स्टेल्थ विमान म्हणजेच स्टेल्थ यूएव्ही विकसित करण्याच्या दिशेनं एक प्रभावी पाऊल मानलं जात आहे. ने डीआरडीओनं कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी श्रेणीतून स्वायत्त फ्लाइंग विंग तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे पहिले उड्डाण यशस्वीरित्या केलं. हा प्रयोग संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.







 
दरम्यान, स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरचे हे उड्डाण भविष्यातील मानवरहित विमानांच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे. अशा धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याचा स्वदेशी स्टेल्थ अटॅक-ड्रोन बनवण्याशीही संबंध जोडला जात आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळं अशी यूएव्ही शत्रूच्या रडारलाही चकवा देण्यास सक्षम आहेत. 


 






बंगळुरुच्या ADE प्रयोगशाळेनं विकसित केलं विमान


मानवरहित हवाई विमान DRDO, बंगळुरुच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) प्रयोगशाळेनं डिझाइन आणि विकसित केलं आहे. हे लहान टर्बोफॅन इंजिनद्वारे समर्थित आहे. विमानासाठी वापरण्यात येणारी एअरफ्रेम, अंडरकॅरेज आणि संपूर्ण उड्डाण नियंत्रण आणि एव्हीओनिक्स प्रणाली स्वदेशी विकसित करण्यात आली होती. दरम्यान, मानव विरहीत विमानाचे यशस्वी उड्डाण जाल्यानंतक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केलं आहे. स्वायत्त विमानांसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. गंभीर लष्करी यंत्रणेच्या दृष्टीनं आत्मनिर्भर भारताचा मार्ग मोकळा करेल असेही राजनाथ सिंह म्हणाले. या विमानासाठी वापरण्यात आलेलं एअरफ्रेम, अंडरकॅरेज आणि संपूर्ण फ्लाइट कंट्रोल आणि एव्हीओनिक्स सिस्टीम स्वदेशी विकसित केल्या आहेत. लष्करी तंत्रज्ञानाच्या दिशेनं भारतानं टाकलेलं हे एक मोठं पाऊल आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी या प्रणालीच्या डिझाइन, विकास आणि चाचणीमध्ये सहभागी असलेल्या टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.