एक्स्प्लोर

जयंती विशेष : जेव्हा डॉ. कलामांनी मुशर्रफ यांना अर्धा तास लेक्चर दिलं!

डॉ. अब्दुल कलाम आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यातला एक किस्सा नेहमी सांगितला जातो. ज्यामध्ये कलाम यांनी परवेझ मुशर्रफ यांना अर्धा तास लेक्चर दिलं होतं.

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे. भारताचा माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं. एका नावाड्याचा मुलगा, वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती, कलामांची ही वाटचाल थक्क करणारी आहे. डॉ. अब्दुल कलाम आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यातला एक किस्सा नेहमी सांगितला जातो. ज्यामध्ये कलाम यांनी परवेझ मुशर्रफ यांना अर्धा तास लेक्चर दिलं होतं. कलाम-मुशर्रफ भेट जनरल परवेझ मुशर्रफ 2005 मध्ये भारतात आले, त्यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही भेट घेतली.  भेटीच्या एक दिवस आधी कलाम यांचे सचिव पी के नायर भेटीची संक्षिप्त माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे आले. पीके नायर यांनी सांगितलं की, ''सर उद्या मुशर्रफ तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहेत. कलाम यांनी उत्तर दिलं, ''हो मला माहित आहे.'' नायर म्हणाले, "मुशर्रफ नक्कीच काश्मिरचा मुद्दा उपस्थित करतील. तुम्हाला यासाठी तयार राहायला हवं." कलाम एका क्षणासाठी थांबले, सचिवांकडे पाहिलं आणि म्हणाले, "तुम्ही काळजी करु नका. मी व्यवस्थित सांभाळून घेऊ." तीस मिनिटांची भेट दुसऱ्या दिवशी बरोबर सात वाजून तीस मिनिटांनी परवेझ मुशर्रफ त्यांच्या ताफ्यासह राष्ट्रपती भवनात पोहोचले. त्यांना पहिल्या मजल्यावरील नॉर्थ ड्रॉईंग रुममध्ये नेण्यात आलं. कलाम यांनी मुशर्रफ यांचं स्वागत केलं. त्यांच्या खुर्चीपर्यंत गेले आणि त्यांच्या शेजारी बसले. भेटीचा वेळ तीस मिनिटं निश्चित करण्यात आला होता. कलामांनी बोलण्यास सुरुवात केली, "राष्ट्रपती महोदय, भारतासारखेच तुमच्याकडेही अनेक ग्रामीण भाग असतील. तुम्हाला वाटत नाही का, त्यांच्या विकासासाठी आपल्याला शक्य तेवढं करायला हंव?" जनरल मुशर्रफ केवळ 'हो' शिवाय आणखी काहीच बोलू शकले नाहीत. वैज्ञानिकही आणि चतूरही कलाम यांनी बोलायला सुरुवात केली, "मी तुम्हाला संक्षिप्तपणे 'पूरा' बाबत सांगतो. 'पूरा'चा अर्थ आहे, प्रोव्हायडिंग अर्बन फॅसिलिटीज टू रुरल एरियाज." कलाम यांनी पुढील 26 मिनिटांपर्यंत मुशर्रफ यांना 'पूरा'चं अर्थ आणि पुढील 20 वर्षांमध्ये दोन्ही देश 'पूरा' कशाप्रकारे लागू करु शकतात, याबाबत लेक्चर दिलं. 30 मिनिटांनंतर मुशर्रफ म्हणाले की, "धन्यवाद राष्ट्रपती महोदय, भारत भाग्यवान आहे, त्यांच्याकडे तुमच्यासारखा एक वैज्ञानिक राष्ट्रपती आहे." त्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली आणि नायर यांनी त्यांच्या डायरीत लिहिलं की, "कलाम यांनी आज दाखवून दिलं वैज्ञानिकही चतूर असू शकतो." 3 लाख 52 हजार रुपये मे 2006 मध्ये राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं संपूर्ण कुटुंब त्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आलं होतं. ते एकूण 52 जण होते. त्यांचा 90 वर्षांचा मोठा भाऊ, नातवंड, परतवंडही त्यांना भेटण्यासाठी आले होते. हे सगळे आठ दिवसांपर्यंत राष्ट्रपती भवनात राहिले. अजमेर शरीफला गेले. कलाम यांनी त्यांच्या राहण्याचा संपूर्ण खर्च स्वत:च्या खिशातून केला. इतकंच नाही तर एका चहाचाही त्यांनी हिशेब ठेवला आणि ते गेल्यानंतर कलाम यांनी स्वत:च्या अकाऊंटमधून 3 लाख 52 हजार रुपयांचा चेक राष्ट्रपती कार्यालयाला पाठवला. कलाम राष्ट्रपतीपदावर असेपर्यंत ही बाब कोणालाही माहित नव्हती. मात्र सचिव नायर यांनी अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केलेल्या दिवसांवर पुस्तक लिहिलं, त्यात पहिल्यांदा या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. इफ्तारचा पैसा अनाथ आश्रमाला नोव्हेंबर 2002 मध्ये रमझानच्या महिन्यात कलाम यांनी त्यांच्या सचिवांना बोलावून विचारलं, आपण इफ्तार पार्टीचं आयोजन का करावं? तसंही इथे आमंत्रित केलेले मान्यवर सुखवस्तू घरातील असतात. तुम्ही इफ्तारवर एवढा खर्च का करतात? कलाम यांनी राष्ट्रपती भवनाच्या अतिथी विभागाच्या प्रमुखांना फोन केला. त्यांनी सांगितलं की, इफ्तार पार्टीवर जास्तीत जास्त अडीच लाखांचा खर्च येतो. कलाम म्हणाले की, "आपण हा पैसा अनाथ आश्रमांना देऊ शकत नाही का? तुम्ही अनाथ आश्रम निवडा आणि पैसा वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावा." राष्ट्रपती भवनातर्फे इफ्तारसाठी निर्धारित असेलेल्या रकमेतून पीठ, डाळ, पांघरुण आणि स्वेटर घेण्यात आली आणि सगळ्या वस्तू 28 अनाथ आश्रमांमधील मुलांना वाटल्या. पण हा किस्सा इथेच संपला नाही. कलाम नायर यांना म्हणाले की, "तुम्ही हे सामान तर सरकारी पैशांतून खरेदी केलं आहे, यात माझं योगदान काहीच नाही. मी तुम्हाला एक लाख रुपयांचा चेक देतो. त्याचा वापरही इफ्तारसाठी निर्धारित केलेल्या पैशांप्रमाणेच करा आणि कोणाला सांगू नका हे पैसे मी दिले आहेत."

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget