येत्या 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार, काय आहे तिकिटाचे नवे दर?
नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने हवाई भाड्याची मर्यादा 13 ते 16 टक्क्यांनी वाढविली आहे. त्यामुळे येत्या 1 जूनपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत.
नवी दिल्ली : तुम्ही विमान प्रवास करत असाल तर येत्या 1 जूनपासून तुमच्या खिशावर अधिक ताण पडणार आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने हवाई भाड्याची मर्यादा 13 ते 16 टक्क्यांनी वाढविली आहे. त्यामुळे येत्या 1 जूनपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे
नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 1 जूनपासून 2600 रुपये आकारण्यात येणार आहे. सध्या या प्रवासासाठी 2300 रुपये मोजावे लागतात. तसेच 40 ते 60 मिनिटांच्या प्रवासासाठी 2900 रुपये मोजावे लागत होते परंतु 13 टक्के वाढ करण्यात आल्याने आता 3300 रुपये मोजावे लागणार आहे.
60-90 मिनिटे | 4,000 |
90-120 मिनिटे | 4,700 |
120-150 मिनिटे | 6,100, |
150-180 मिनिटे | 7,400 |
180-210 मिनिटे | 8,700 |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं आता 30 जूनपर्यंत रद्द ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात जाणाऱ्यांसाठीची विमानं ही 30 जूनपर्यंत बंद राहतील.
Airfare charges increased with effect from 1st June 2021
With respect to amount of fares to be charged by the Airlines for journey on a particular sector, the sectors classified on basis of approx duration of flight & for such classes, the min & max fares chargeable are as under pic.twitter.com/Rb5NTjnmMV
— ANI (@ANI) May 29, 2021
या निर्णयाने एअरलाइन्स कंपन्यांना मोठी मदत मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या संख्येने कमी झाली आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.