एक्स्प्लोर

दोन एप्रिलला डॉक्टरांचा देशव्यापी संप

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील डॉक्टरांच्या विरोधातील मुद्दे काढून टाकण्याची डॉक्टरांची मागणी आहे.

मुंबई : येत्या 2 एप्रिलला देशव्यापी संप पुकारण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असून, या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे. हे विधेयक गरीब विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणार असल्याचे मत डॉक्टरांचे आहे. 25 मार्चला दिल्लीत नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात डॉक्टरांनी महापंचायत आयोजित केली होती. या मेळाव्याला देशभरातून 25 हजार डॉक्टर आणि मेडिकलचे विद्यार्थी आले होते. या महापंचायतीत संपाचा निर्णय घेण्यात आला. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक हे वैद्यकीय व्यवसायाच्या विरोधात असल्याची भावना डॉक्टरांची आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील डॉक्टरांच्या विरोधातील मुद्दे काढून टाकण्याची डॉक्टरांची मागणी आहे. डॉक्टरांच्या मागण्या काय?
  • ब्रिज कोर्स सक्तीचा करण्यात येऊ नये. राज्य सरकारने राज्यातील वैद्यकीय सुविधा आणि गरजा पाहून यावर योग्य ती उपाययोजना करावी.
  • नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील सदस्यांची संख्या वाढवून 29 करावी. ज्यात डॉक्टरांमधून निवडून आलेल्या 9 सदस्यांचा तर, प्रत्येक राज्याने सुचवलेल्या 10 सदस्यांचा समावेश करण्यात यावा.
  • एक्झिट परीक्षा रद्द करण्यात यावी. यामुळे तळागाळातून येणाऱ्या मुलांवर खूप दबाव वाढेल. ही मुलं परीक्षेसाठी चांगल्या कोचिंगसाठी पैसे खर्च करू शकणार नाहीत. एमबीबीएसची परीक्षाच एक्झिट परीक्षा म्हणून मानण्यात यावी. यासाठी राज्य सरकारने सर्व शेवटच्या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच पेपर सेट करावा. जेणेकरून राज्यातून पास होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एकच परीक्षा पास झाल्यानंतर डिग्री मिळेल.
  • राज्यातील खासगी वैद्यकीय विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून किती फी घ्यावी, याचा सद्यस्थितीला असलेला अधिकार कमी करण्यात येऊ नये. पण ज्या महाविद्यालयांवर अंकुश नाही, अशा महाविद्यालयातील 50 टक्के जागांची फी निश्चिती करावी.
  • बाहेरच्या देशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात आलेल्या डॉक्टरांबाबत नॅशनल मेडिकल कमिशनने चौकशी करून निर्णय घ्यावा.
  • नॅशनल मेडिकल कमिशनच्या सर्व सदस्यांनी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असणाऱ्या संपत्तीची माहिती सार्वजनिक करावी.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
Stock Market Crash : शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
Jalgaon Accident: वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
Goregaon Toilet Death: रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: आंदोलनातील सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
October Heat : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget