Diwali Travel: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. अशात जो कोणी कामानिमित्त, शिक्षणानिमित्त घरापासून दूर बाहेरगावी राहत असेल, तो खास दिवाळीच्या सुट्टीत आपल्या घरी येतो. अशात अनेक जण भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) प्रवासाला अधिक पसंती देतात. कारण हा प्रवास बजेटमध्ये आणि आरामदायी मानला जातो. सध्या वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Train) सर्वात जास्त चर्चा आहे. ही अशी ट्रेन आहे, ज्यामधून प्रत्येकाला प्रवास करायची इच्छा असते. वंदे भारत ट्रेनचे तिकीट कितीही महाग असले तरी लोकांना त्यातून प्रवास करायला आवडते. देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात याचं तिकीट मिळणं तसं मुश्कीलच असते. मग वंदे भारत ट्रेनमध्ये 'वेटिंग तिकीट' घेऊन प्रवास करता येईल का? काय आहे नियम? जाणून घ्या


प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे कठीण 


एकीकडे वंदे भारत ट्रेनच्या 125 हून अधिक सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात धावत आहेत, तर दुसरीकडे वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या आगमनाची तयारीही जोरात सुरू आहे. मात्र इतक्या गाड्यांनंतरही प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे कठीण झाले आहे. परिस्थिती अशी आहे की, वंदे भारत ट्रेन, ज्याची तिकिटे इतर गाड्यांपेक्षा महाग आहेत, ती देखील आता वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादीत आहे. सध्या वंदे भारत वेटिंग तिकिटांच्या कन्फर्मेशनची वाट पाहणारे बरेच लोक आहेत. मात्र वंदे भारत ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करता येईल का, हा प्रश्न त्यांच्या मनात घोळत आहे. इतर ट्रेनमध्ये, प्रवासी अनेकदा वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करताना दिसतात. पण कन्फर्म तिकीटाशिवाय वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास केल्यास काय होईल. यासंबंधीची सविस्तर माहिती जाणून घ्या...


वंदे भारत ट्रेनमध्ये 'वेटिंग तिकीट' घेऊन प्रवास करता येईल का? 


याच्या नियमाबद्दल बोलायला गेलं तर, जर तुम्हाला ट्रेनमध्ये चांगली सुविधा मिळत असेल तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. जर तुमचे तिकीट वेटिंगमध्येअसेल तर याचा अर्थ तुमच्याकडे ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी सीट नाही. प्रतीक्षा यादीतील तिकीट असलेल्या प्रवाशांना कोणताही आसन क्रमांक मिळत नाही. तुम्ही वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करत असाल किंवा इतर कोणत्याही ट्रेनमध्ये, वेटिंग लिस्ट केलेले तिकीट घेऊन प्रवास करणे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. कारण प्रवाशांचे तिकीट वेटिंग असल्यास त्यांना त्यांचे पैसे परत मिळतात. अशा परिस्थितीत तुम्ही प्रवास करत असाल तर याचा अर्थ असा आहे की, तुम्ही कोणत्याही सीटशिवाय प्रवास करत आहात. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून हे नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला वेटिंग तिकिटाचा नियम माहित असायला हवा.


वेटिंग तिकीट घेऊन प्रवास केल्यास काय होईल?


जर तुम्ही वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करत असाल तर तुम्हाला यासाठी मोठा दंड भरावा लागेल. यासाठी तुम्हाला पुढील स्टेशनवरही उतरवण्यात येऊ शकते. TTE तुमच्याकडून 500 रुपये दंड आकारू शकतात. जर तुम्ही वेटिंग तिकीट घेऊन लांबचा प्रवास केला असेल तर हा दंड जास्त असू शकतो.


 


हेही वाचा>>>


Travel: दिवाळीसाठी रेल्वेचं Advance तिकीट बुक करताय? 120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार नाही, बुकिंग प्रणालीतील बदल जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )