Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदची बातमी आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांची (Railway Employees) यंदाची दिवाळी गोड होणार आहे. याचे कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर  (Union Minister Anurag Thakur) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल. ते म्हणाले की, 11.27 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना 1,832 कोटी रुपये बोनस दिला जाईल. याची कमाल मर्यादा 17,951 रुपये असेल. 


तेल वितरण कंपन्यांना देण्यात आला अनुदान 


यासोबतच तेल वितरण कंपन्यांना 22,000 कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्यात आला आहे. जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत वाढ होऊनही देशांतर्गत एलपीजीच्या (LPG) किमतीत वाढ न केल्याने नुकसान होऊ नये, तसेच या नुकसानीची भरपाई करता यावी म्हणून हा अनुदान देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


गुजरातमध्ये  कंटेनर टर्मिनल बांधले जाणार


पत्रकार परिषदेत कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, गुजरातमधील कांडला येथे दीनदयाल बंदर प्राधिकरणाअंतर्गत कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय कार्गो बर्थ (Multi Purpose Cargo Berth ) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.


मंत्रिमंडळाने आणखी कोणते निर्णय घेतले?


केंद्रीय  मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे की, पूर्वोत्तर राज्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी PM-devine योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना चार वर्षांसाठी असेल. ठाकूर यांनी असेही सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2022 मंजूर केले आहे. जे बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002 मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये 96 व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदींचा समावेश असेल.




इतर महत्वाच्या बातम्या: 


Andheri East Bypoll Election: ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी पालिका आयुक्तांवर दबाव; ठाकरे गटाचा आरोप
Sanjay Raut : 'आई मी नक्की परत येईन', कोठडीत असलेल्या संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र