नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणतंही नुकसान झालेलं नाही, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना अरुण जेटली यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल देशातील जनतेचे आभार मानले.


नोटाबंदीनंतर देशात प्रत्यक्ष करात 13.6 टक्कांची वाढ झाल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.


नोटाबंदीचं समर्थन करताना जेटली यांनी सांगितलं की, "करवसुलीबाबत या निर्णयाचे परिणाम दिसत आहे. विरोधकांना कितीही टीका करु दे, पण नोटाबंदीनंतरही प्रत्यक्ष करात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे."


 

चलनकल्लोळाबाबत जेटली म्हणाले की, 'रिझर्व्ह बँकेकडे मोठ्या प्रमाणात नव्या नोटा उपलब्ध आहेत. याशिवाय 500 च्या नव्या नोटाही वेगाने चलनाच येत आहेत."

दरम्यान, नोटाबंदीनंतर 30 डिसेंबर ही जुन्या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख आहे. तर नववर्षाच्या पूर्वसंध्येला (31 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मोदी उद्या नवी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.