एक्स्प्लोर

डिजिटल व्यवहारांवरील सेवा कराची मर्यादा लवकरच निश्चित होणार!

नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या सेवा कराची (सर्व्हिस चार्ज) मर्यादा लवकरच ठरवण्यात येणार आहे. सरकारकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. डेबिट/क्रेडिट कार्ड कंपन्या, ऑनलाईन डिजिटल पेमेंट कंपन्या सेवेच्या मोबदल्यात ग्राहकांकडून सेवा कर वसूल करतात. कार्ड कंपन्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या कराला एमडीआर म्हणजेच मर्चंट डिस्काऊंट रेट असंही म्हटलं जातं. रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक केल्यास सेवा चार्ज लागणार नाही, अशी तरतूद या अर्थसंकल्पात अगोदरच करण्यात आली आहे. आयआरसीटीसीला यामुळे 500 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे इतर प्रकारच्या व्यवहारावरीलही सेवा कर हटवला जाणार का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. डेबिट कार्डवर सध्या लागणारा सेवा कर डेबिट कार्डद्वारे एक हजार रुपयांपर्यंत व्यवहार केल्यास 0.25 टक्के म्हणजे अडीच रुपये कर लागतो. त्यापेक्षा अधिक आणि 2 हजार रुपयांपेक्षा कमी व्यवहारावर 0.5 टक्के म्हणजे जास्तीत जास्त 10 रुपये कर द्यावा लागतो. तर 2 हजार रुपयांवरील व्यवहारासाठी पहिल्याप्रमाणेच 1 टक्का सेवा कर लागणार आहे. ही करप्रणाली 31 मार्चपर्यंत लागू असेल. क्रेडिट कार्डच्या सेवा कराची मर्यादा सध्या निश्चित केली जाणार नाही. कारण क्रेडिट कार्ड ही एक विशेष सुविधा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे सेवा कर आकारायचा की नाही, याचा निर्णय कार्ड कंपन्या स्वतः घेऊ शकतात. आपल्याच पैशावर आपण सेवा कर का द्यायचा, असा सवाल ग्राहकांकडून केला जातो. मात्र कार्ड सेवा देण्यासाठी कंपन्यांना येणारा खर्च सेवा करातून वसूल केला जातो, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. शिवाय नोटाबंदीनंतर स्थापन केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीनेही सर्व प्रकारचा सेवा कर हटवण्याची शिफारस केलेली आहे. त्यामुळे अर्थमंत्रालय सेवा कर हटवणार का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! UPI पेमेंट शुल्काचं अंतिम सूत्र समोर, 5 हजारासाठी किती रुपये कट होणार? जाणून घ्या गणित
मोठी बातमी! UPI पेमेंट शुल्काचं अंतिम सूत्र समोर, 5 हजारासाठी किती रुपये कट होणार? जाणून घ्या गणित
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
फक्त 4 टक्के व्यवहारांवरच UPI शुल्क लागू, 96 टक्के व्यवहार विनामूल्य, व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर सरकारचं स्पष्टीकरण
फक्त 4 टक्के व्यवहारांवरच UPI शुल्क लागू, 96 टक्के व्यवहार विनामूल्य, व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर सरकारचं स्पष्टीकरण
boAt Dual Subwoofer Soundbars: boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Eknath Shinde on Manoj Jarange: आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Embed widget