एक्स्प्लोर

दिल्लीत डिझेल पेट्रोलपेक्षा महाग, सलग अठराव्या दिवशी दरवाढ सुरुच

राजधानी दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा महाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज (24 जून) सलग अठराव्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : भारतीय बाजारात डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. राजधानी दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा महाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज (24 जून) सलग अठराव्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर कालएवढेच आहेत मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात प्रति लिटर 10.48 रुपयांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलही 8.50 रुपयांनी महागलं आहे.

18 दिवसात डिझेल 10.48 रुपयांनी महागलं आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 18 दिवसांपैकी बरेच दिवस दिवस क्रूड ऑईलचे दर सामान्यच राहिले. पण भारतीय बाजारात याचे दर सतत वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत 40 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किमतीत त्या हिशेबाने कमी झालेल्या नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात 10.48 रुपये प्रति लीटरने वाढ झाली हे. या अठरा दिवसात पेट्रोलचे दरही 8.50 रुपये प्रति लिटर वधारले आहेत.

पेट्रोलच्या तुलनेत डिझेल असं वधारलं! दिल्लीमध्ये इंधनावर लागणारा कर एप्रिल महिन्यापर्यंत देशात सर्वात कमी होता तर मुंबईत सर्वाधिक होता. दिल्ली सरकारने 4 मे रोजी डिझेलवरील व्हॅट 16.75 टक्क्यांनी वाढवून 30 केल्यानंतर दिल्लीमध्ये डिझेलची किंमत मुंबईपेक्षाही वाढली आहे. पेट्रोलवरचा व्हॅटही वाढवला, आधी 27 टक्के असलेला व्हॅट आता 30 टक्के करण्यात आला. यामुळे पेट्रोलच्या दरात 1.67 रुपयांनी वाढ झाली. तर डिझेलचे दर 7.10 रुपयांनी वधारले.

दिल्ली वगळता इतर राज्यांमध्ये डिझेल स्वस्त डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत अंतर असण्याचं कारण म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवर कमी कर आकारतं. पण ऑक्टोबर 2014 मध्ये इंधन दरावरील सरकारचं नियंत्रण हटल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर फारच कमी होत गेलं. आता दिल्लीत तर अशी परिस्थिती आहे की, डिझेलचे दर पेट्रोलपेक्षा जास्त आहे. मात्र महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. खरंतर दिल्लीमध्ये पेट्रोलवर 64 टक्के कर आकारला जातो आणि डिझेलवर 63 टक्के कर आहे. कर समान असल्याने त्यांच्या दरातील अंतर जवळपास संपलं आहे.

दिल्लीत डिझेल पेट्रोलपेक्षा महाग, सलग अठराव्या दिवशी दरवाढ सुरुच

महत्त्वाच्या बातम्या

Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Shield Multi Cancer Detection: फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
PM Modi Australia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget