एकीकडे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन यांनी आपल्या सेवांच्या किंमती वाढवलेल्या असताना सरकारी कंपनी बीएसएनएल परवडणाऱ्या दरात आपली सेवा देत आहे. बीएसएनएल अशा अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते, जे कमी किमतीत ग्राहकांना जास्त फायदे देतात. जर तुम्ही कमी किमतीच्या प्रीपेड प्लॅन्सच्या शोधात असाल, तर तुम्ही बीएसएनएलचे हे रिचार्ज प्लॅन ट्राय करू शकतात. 


49 पासून सुरू BSNL Plans


कंपनीचे दोन असे प्लॅन आहेत, ज्यांची किंमत अतिशय कमी आहे. ज्या वापरकर्त्यांना कमी खर्चात अधिक वैधता हवी आहे, त्यांच्यासाठी या योजना खास आहेत. BSNL च्या STV 49 मध्ये, वापरकर्त्यांना 24 दिवसांची वैधता मिळते. 49 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना व्हॉईस कॉलसाठी 100 फ्री मिनिटे मिळतात. तसेच, वापरकर्त्यांना एकूण वैधतेसाठी 2GB डेटा मिळतो.


आणखी ही आहेत स्वस्त प्लॅन 


याशिवाय कंपनी 99 रुपयांचा प्लान ऑफर करते, जो फक्त व्हॉईस कॉलिंगसाठी आहे. या प्लॅनची ​​वैधता 22 दिवसांची आहे. म्हणजेच 22 दिवस तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय फ्री कॉलिंग करू शकता. कंपनी 135 रुपयांचा प्लान देखील ऑफर करते. Voice 135 मध्ये वापरकर्त्यांना कॉल करण्यासाठी एकूण 1440 मिनिटे मिळतात. या प्लॅनची ​​वैधता 24 दिवसांची आहे.


डेटासाठीही आहेत अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन 


डेटा ऑफरच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर कंपनी STV 118 मध्ये डेटा आणि कॉलिंग दोन्ही फायदे ऑफर करते. यामध्ये यूजर्सला दररोज 0.5GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता 26 दिवसांची आहे. म्हणजेच यूजर्सना एकूण 13GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. दुसरीकडे STV 147 या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 10GB डेटा ऑफर करते. यासोबतच अनलिमिटेड कॉल्स आणि बीएसएनएल ट्यूनची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला 147 रुपयांमध्ये 30 दिवसांची वैधता मिळते.


महत्वाच्या बातम्या :