एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तलवार दाम्पत्याची आज सुटका, मात्र दर 15 दिवसांनी जेलवारी
तलवार दाम्पत्याने कारागृहातील दाताचा दवाखाना सांभाळला होता. आता त्यांची कारागृहातून सुटका होणार असल्यामुळे त्यांच्यानंतर जेलमधील दाताचा दवाखाना कोण चालवणार, हा प्रश्न कारागृह प्रशासनापुढे होता.
नवी दिल्ली : आरुषी तलवार आणि हेमराज हत्याकांडाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले आरुषीचे आई-वडील म्हणजेच नुपूर आणि राजेश तलवार यांची आज सुटका होणार आहे. मात्र तलवार दाम्पत्य 15 दिवसातून एकदा कारागृहाला भेट देणार आहे.
दंतचिकित्सक असणारे तलावर दाम्पत्य 2013 मध्ये गाझियाबादच्या दासना कारागृहात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी कारागृहातील दाताचा दवाखाना सांभाळला होता. आता त्यांची कारागृहातून सुटका होणार असल्यामुळे त्यांच्यानंतर जेलमधील दाताचा दवाखाना कोण चालवणार, हा प्रश्न कारागृह प्रशासनापुढे होता.
प्रशासनाने तलवार दाम्पत्याला दर 15 दिवसांनी कारागृहातील कैद्यांना तपासायला येण्याची विनंती केली होती. तलावार दापत्याने त्यांची ही विनंती मान्य केली आहे, असं कारागृहाचे डॉक्टर सुनिल त्यागी यांनी संगितलं. त्यामुळे तलावार दाम्पत्याला दर 15 दिवसांनंतर कारागृहात यावं लागणार आहे.
तलवार दाम्पत्याला आजही तुरुंगातच रहावं लागणार!
12 ऑक्टोबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयानं तलवार दाम्पत्याची आरुषी-हेमराज हत्या प्रकरणातून सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. त्यामुळे आरुषी-हेमराजचे मारेकरी आहेत तरी कोण, असा सवाल आता सर्वसामान्यांना पडला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? 2008 साली आरुषी हत्याकांडानं संपूर्ण देश हादरुन गेला होता. 16 मे 2008 या दिवशी नोएडातील जलवायू विहार परिसरातून 14 वर्षीय आरुषीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या दिवशी छतावरुन तलावर कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला होता. या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी आरुषिचे वडील राजेश तलवार यांना अटक केली होती. 29 मे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. त्यानंतर सीबीआयनं चौकशी करुन तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातील सर्व सुनावणीनंतर कोर्टानं 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.संबंधित बातम्या :
अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर तलवार दाम्पत्य भावूक
आरुषी हत्याकांड : निकालाआधीच्या रात्री नेमकं काय घडलं?
आरुषी हत्याकांडातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
रायगड
क्रिकेट
Advertisement