मुंबई: नोटाबंदीमुळे घरं आणि वाहन विक्रीत घट झाली आहे. वाहनविक्रीने गेल्या 16 वर्षातील निचांक गाठला आहे. डिसेंबर महिन्यात वाहन विक्री 18.66 टक्क्यांनी घसरली, तर घरांच्या विक्रीत 44 टक्क्यांनी घट झाली.
वाहन कंपन्यांनी अनेक ऑफर्स देऊनही डिसेंबरमध्ये अपेक्षित विक्री झाली नाही. मात्र नव्या वर्षात वाहन कंपन्यांनी ऑफर्स गुंडाळून दर वाढवले आहेत. त्यामुळे या महिन्यात किती विक्री होते हे पाहावं लागणार आहे.
डिसेंबर २०१६ मध्ये कार विक्रीत 8.14 टक्के घट झाली. तर प्रवासी विक्री 1.36 टक्क्यांनी खाली आली.