सुरत : नोटाबंदीनंतर नव्यानं आलेल्या दोन हजाराच्या नोटेचं अप्रूप सर्वांनाच होतं. आता या नोटेचं डिझाईन असलेली प्रिंटेड साडीही बाजारात उपलब्ध होत आहे.
गुजरातच्या सुरतमधील शंकर भाई सैनी या कापड व्यापाऱ्यानं या साडीच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. देशभरातून या साडीला मोठी मागणी होत आहे. विशेष म्हणजे या साडीची किंमत फक्त 160 रुपये असणार आहे.
आधीच गुलाबी रंगाचं महिलांना कौतुक असतं, त्यात या रंगाची दोन हजाराच्या नोटेचं डिझाईन असलेली साडी बाजारात आल्यास त्यांची गर्दी होईल, असा विश्वास व्यापाऱ्याला होता. एका साडीवर दोन हजाराच्या 504 नोटा आहेत.
ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या राज्यात 2 हजाराच्या प्रिंटेड साडीला मोठी मागणी असल्याचं सैनी यांचं म्हणणं आहे. सध्या सुरतमध्ये सैनी यांच्या दुकानात या साडीची विक्री होत असून महिलांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.