वाराणसी : भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या सनई चोरीप्रकरणी त्यांच्याच नातवासह तिघांना अटक करण्यात आली आहे. वाराणसी पोलिसांच्या विशेष कृती दलाने ही कारवाई केली आहे.

मागील महिन्यात बिस्मिल्ला खाँ यांच्या घरातून चांदीच्या सनईंची चोरी झाली होती. 5 डिसेंबर रोजी चोरीची तक्रार नोंदवली होती. चोरीला गेलेल्या पाच सनईंपैकी चार सनई सापडल्या आहे. मात्र तीन सनई वितळलेल्या अवस्थेत सापडल्या असून एक सनई पूर्ण अवस्थेत आहे.


उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या पाच सनईंवर चोरांचा डल्ला


 

बिसमिल्ला खाँ यांचा नातू नजरे हसन शादाबने काही जणांकडून घेतलेली उधारी चुकवण्यासाठी हा प्रकार केला. त्याने ज्या ज्वेलर्सला सनई विकल्या होत्या, त्या दोन ज्वेलर्सला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, घरातील व्यक्तीनेच सनया चोरल्याने उस्ताद बिसमिल्ला खाँ यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.