एक्स्प्लोर

नोटाबंदी काळात काळ्याचं पांढरं करणारे 34 CA सरकारच्या रडारवर

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात काळा पैसा पांढरा करण्यासाठी मदत करणाऱ्या 34 चार्टर्ड अकाऊंटंट्सची नावं सरकारने चार्टर्ड अकाऊंटंट इन्स्टिट्यूटकडे पाठवली आहेत. या 34 जणांची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सरकारला पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आयसीएआय म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया ही देशभरातील सर्व चार्टर्ड अकाऊंटंट्सची सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था सीए कायद्यान्वये स्थापन झालेली असून देशभरातील चार्टर्ड अकाऊंटंटना सनद बहाल करते. आयसीएआयने प्रमाणित केल्याशिवाय कुणालाही चार्टर्ड अकाऊंटंटची प्रॅक्टीस करता येत नाही. नोटाबंदीच्या काळात काळा पैसा पांढरा करण्यात मदत करणाऱ्या 34 चार्टर्ड अकाऊंटंटची यादी केंद्र सरकारकडून मिळाल्याच्या वृत्ताला आयसीएआयचे अध्यक्ष निलेश एस विकमसे यांनी दुजोरा दिला आहे. सरकारने दिलेल्या यादीतील सर्व चार्टर्ड अकाऊंटंटची सखोल चौकशी लवकरच सुरू केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्याच आठवड्यात सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, तब्बल 559 जणांनी 3900 कोटी रूपयांचा काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पांढरा केला आहे. यासाठी त्यांना तब्बल 54 सीएंनी मदत केल्याची माहितीही केंद्र सरकारने जारी केली होती. त्याचवेळी ही माहिती अर्थ मंत्रालयाने ईडी आणि प्राप्तिकर विभागाला पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. आयसीएआयकडे सरकारकडून आलेल्या यादीतील चार्टर्ड अकाऊंटंटची माहिती घेऊन त्यांना शो कॉज नोटिसा पाठवण्याची कारवाई सुरू झालीय. प्राथमिक चौकशीत संबंधित चार्टर्ड अकाऊंटंटनी काळा पैसा पांढरा करण्यात मदत केल्याचं सिद्ध झालं तर ती प्रकरणं शिस्तपालन समितीकडे पाठवली जाणार आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी असल्याचं सिद्ध झाल्यानंतर कुणाही चार्टर्ड अकाऊंटंटवर निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार आयसीएआयला नसल्याचं अध्यक्ष निलेश विकमसे यांनी स्पष्ट केलं. सध्याच्या सीए कायद्यात दुरूस्ती करून आयसीएआयला गैरवर्तणूक करणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटंटवर कारवाई करण्याचे अधिकार मिळायला हवेत, ही आयसीएआयची जुनी मागणी आहे. आयसीएआयचे उपाध्यक्ष नवीन गुप्ता यांनी सांगितलं प्राप्तिकर परताव्यात चुकीची माहिती देणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटंटवर प्राप्तिकर कायद्यान्वये कारवाई करता येते. म्हणजेच कारवाईची तरतूद आहे, मात्र त्याचे अधिकार आयसीएआयकडे नाहीत. हे अधिकार आयसीएआयला देण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget