नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारात पोलीस हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला होता. रतनलाल यांचा मृत्यू दगड लागल्यानं नव्हे, तर गोळी लागल्यानं झाल्याचा खुलासा शवविच्छेदन अहवालातून करण्यात आला आहे. रतनलाल यांच्या डाव्या खांद्यात शिरलेली गोळी उजव्या खांद्यापर्यंत पोहोचली होती, असं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट केलं आहे. शहीद हेडकॉन्स्टेबल रतनलाल एसीपी गोकुळपुरी ऑफिसमध्ये तैनात होते. दरम्यान, दिल्लीमध्ये गेले 2 दिवस सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये हिंसाचार सुरू आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांवर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल रतनलाल गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला होता.


शहीदत्वाचा दर्जा देण्याची कुटुंबियांची मागणी


दिल्ली हिंसाचारामध्ये शहीद झालेले हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांचं पार्थिव रस्त्यावर गाडीमध्ये ठेवून लोक आंदोलन करत आहेत. राजस्थान येथील सीकरमधील पैतृक गावामध्ये लोक आंदोलनासाठी बसले आहेत. रतन लाल यांचे कुटुंबिय आणि त्यांच्या गावातील लोक मुख्य रस्त्यावर गाडीमध्ये पार्थिव ठेवून आंदोलनासाठी बसले होते. हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांना शहीद हा दर्जा देण्याची कुटुंबिय आणि गावकऱ्यांची मागणी आहे. तसेच जोपर्यंत त्यांना शहीद दर्जा देण्यात येत नाही, तोपर्यंत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


पाहा व्हिडीओ : दिल्ली हिंसाचारात आंदोलक पोलिसांच्या जीवावर उठलेत?



घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षिदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हेडकॉन्स्टेबल रतन लाल आंदोलनकर्त्यांच्या गर्दीत अडकले होते. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. जखमी झालेल्या रतन लाल यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


शहीद रतन लाला यांना आपल्या कामाप्रती निष्ठा होती. दैनिक भास्करमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, दिल्लीमध्ये सोमवारी जेव्हा हिंसा सुरू होती. त्यावेळी त्यांच्या अंगात ताप होता, तरिही ते आपलं कर्तव्य बजावण्यासाठी तैनात होते. टिव्हीवर बातमी पाहिल्यानंतर कुटुंबियांना पोलीस हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांच्या मृत्यूबाबत माहिती मिळाली. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे.


दरम्यान, राजधानी दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनाची धग कायम आहे. आतापर्यंत हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबलसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शूट अॅन्ड साईटचे आदेश पोलिसांनी दिले आहे. हिंसाचार घडवणाऱ्यांना दिसताचं क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहे.


संबंधित बातम्या : 


Delhi Riots | हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅट साईटचे आदेश, डोवाल यांच्याकडून परिस्थितीचा आढावा


Delhi Violence | दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश; दिल्ली पोलिसांकडून शांततेचं आवाहन


Delhi Violence | हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू, 186 जखमी


Majha Vishesh | दिल्ली पेटवण्याचं पाप कुणाचं?